पक्ष सोडलेल्या पिचडांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी वापरणार हा 'विजयी पॅटर्न'

पक्ष सोडलेल्या पिचडांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी वापरणार हा 'विजयी पॅटर्न'

आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात वैभव पिचड यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी 2014 चा 'श्रीगोंदे पॅटर्न' वापरणार आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मार्च : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र आणि आमदार वैभव पिचड यांनी भाजपशी घरोबा केला. पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादीत असलेल्या पिचडांनी आता सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात वैभव पिचड यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी 2014 चा 'श्रीगोंदे पॅटर्न' वापरणार आहे.

मागील विधानसभेला राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण प्रत्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने पाचपुते यांना आश्चर्यकारकरित्या पराभवाचा दणका दिला. यावेळी श्रीगोंद्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत तालुक्यावर पकड असणाऱ्या बबनराव पाचपुते यांना चितपट केलं. याच फॉर्म्युल्याद्वारे आता आम्ही पिचडांचाही सुपडाफ करू, असा दावा राष्ट्रवादीचे अहमनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे.

मधुकर पिचड आणि राष्ट्रवादी

'माझा कोणावरही राग नसून शरद पवारांची साथ सोडताना दु:ख होत आहे, पण ते कायम आमच्या हृदयात आहेत,' असं म्हणत मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. शरद पवारांना सोडून जाण्याचे दु:ख आहे. मात्र मतदार संघातील सामान्य जनता तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा लागल्याचे पिचड यांनी यावेळी सांगितले. लोकांच्या भावना, जनमत आणि जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याने भाजपत जात असल्याचे पिचड यांनी जाहीर केले.

पवारांचा पलटवार

'पक्ष सोडताना जे नेते म्हणत आहेत की शरद पवार हृदयात आहेत, त्यांचं हृदय तपासा,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मधुकर पिचडांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आगामी काळात पक्षांतर केलेल्या नेत्यांबद्दल राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट आहे.

SPECIAL REPORT: परळी जिंकण्यासाठी धनंजय मुंडेंचा नवा प्लान, पंकजांच्या बालेकिल्ल्य़ाला सुरुंग लागणार?

First published: August 5, 2019, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading