आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच प्रॉडक्ट, कन्सलटंसी लाऊन राजकारण करायची वेळ

आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच प्रॉडक्ट, कन्सलटंसी लाऊन राजकारण करायची वेळ

आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच प्रॉडक्ट असून शिवसेनेवर कन्सलटंसी लाऊन राजकारण करायची वेळ आली आहे, अशी खोचक टीका करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेवरून समाचार घेतला.

  • Share this:

वैभव सोनवणे, (प्रतिनिधी)

पुणे, 21 जुलै- आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच प्रॉडक्ट असून शिवसेनेवर कन्सलटंसी लाऊन राजकारण करायची वेळ आली आहे, अशी खोचक टीका करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेवरून समाचार घेतला. शिवसेनेचा मोर्चा हा फेससेव्हिंग आहे. आम्ही आंदोलन करणार आहोत. सरकारच्या विरोधात वातावरण पेटवणार आहोत. आम्ही काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडे आयटी यंत्रणा नाही. तेवढी आमची ताकद नाही. तेवढा पैसे आमच्याकडे नाही, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.जयंत पाटील पुण्यात बोलत होते.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी रविवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रातल्या 288 जागांच्या स्थितीची तपशीलवार चर्चा करण्यात आली. मागवलेल्या अर्जांवर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 288 जांगासाठी साधारण 780 अर्ज आले आहेत. कॉंग्रेससोबत चर्चा करून अंतिम टप्प्यात उमेदवार ठरवण्यात येणार आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेसह भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. आमचे आमदार मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटायला जातात. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्तयांना भाजप विसरले आहे. विरोधक मजबूत नसतील तर मग त्यांचे आमदार का पळवले जात आहेत, असा सवाल यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेना-भाजप युतीत मुख्यमंत्रिपदावरून कलगातुरा सुरू आहे. शिवसेनेला भाजपच नेतृत्त्व मान्य नाही, हे सांगत भाजप सेनेचे नेते आमच्याही संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

राज ठाकरेंबाबत कॉंग्रेसची भूमिका माहीत नाही...

जागा वाटपाबबतची चर्चा बुधवारपर्यंत पूर्ण होईल. प्रकाश आंबेडकरांना मी आणि बाळासाहेब थोरातांनी पत्र पाठवले आहे. आता बघू या काय होते, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत कॉंग्रेसची भूमिका माहीत नसल्याचेही पाटील म्हणाले.

नाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या संतापाचा स्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2019 06:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading