पुढील मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच, शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हेंचा दावा

पुढील मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच, शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हेंचा दावा

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

जुन्नर, 6 ऑगस्ट : ‘शिवसेना आणि भाजपच्या यात्रेमध्ये कुणी ना कुणी मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. पण राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही छत्रपतींच्या मावळ्यांनी रयतेचा आवाज बुलंद करण्यासासाठी काढलेली यात्रा आहे. शिवस्वराज्य यात्रेमुळे पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच असेल,’ असा दावा करत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून सुरू झालेल्या या शिवस्वराज्य यात्रेचा अमोल कोल्हे हे प्रमुख चेहरा असणार आहेत. या यात्रेला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही शरद पवारांना कोणतं गिफ्ट देऊ इच्छिता? असा प्रश्न कोल्हे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी पुढील मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीचाच होणार असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

‘महाराष्ट्रातील समस्यांची सोडवणूक करण्यात सरकार कसं अपयशी ठरलं आहे, हे आम्ही या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू. फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाजाच्या समस्या या यात्रेच्या माध्यामातून मांडल्या जातील,’ असं म्हणत अमोल कोल्हे यांनी आगामी काळात आपण सरकारविरोधात अधिकच आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

शिवस्वराज्य यात्रेचं आजचं वेळापत्रक

मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजीचा कार्यक्रम - दिवस पहिला

सकाळी 11 वा. – जुन्नर

दुपारी 2 वा. - भोसरी

सायं. 5 वा. - शिरूर

सायं. 7 वा. - निघोज पारनेर

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.

VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: amol kolhe
First Published: Aug 6, 2019 12:34 PM IST

ताज्या बातम्या