बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात घ्यायला लागतं, अजित पवारांचा सरकारवर वार

बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात घ्यायला लागतं, अजित पवारांचा सरकारवर वार

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 19 ऑगस्ट : शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात घ्यावं लागतं, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘राष्ट्रवादीने पूरग्रस्त भागात मदत ओतली मात्र कसलेही फोटो काढले नाहीत. मात्र भाजपच्या मंत्र्यांना पूरग्रस्त भागात सेल्फी काढायला यांना लाज वाटत नाही का? कसली मस्ती चढली यांच्या डोक्यात?’ असा सवाल करत अजित पवार यांनी पूरग्रस्त भागात सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या भाजपच्या गिरीश महाजन यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

‘शिवसेना रडीचा डाव खेळत आहे. सरकार तुमचं असताना कसले मोर्चे काढताय? अधिकाऱ्यांकडून पैसे काढा आणि शेतकऱ्यांना द्या. खरिपाचा पीक विमा असताना रब्बीचा पीकविमा काढणाऱ्या कंपनीवर यांनी मोर्चा काढला. आता काय कळतंय का यांना?’ असं म्हणत शेतकरी प्रश्नावरून अजित पवार यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे.

‘अनेक उद्योग अडचणीत आहे. विमान कंपन्या अडचणीत आल्या. इतर कंपन्या तोट्यात आहेत. व्हिडिओकॉन कंपनी बंद पडली. कॅफे कॉफी डेच्या मालकाने आत्महत्या केली. कर भरूनही हाल झाले म्हणून त्यांनी आत्महत्या केली. रेल्वे तोट्यात गेली आहे. वाहन उद्योगात मंदी आली. राज्य कर्जबाजारी केलं आहे. आम्ही पन्नास वर्षे राज्य केलं तेव्हा आम्ही अडीच लाख कोटी कर्ज काढलं. या पठ्ठ्यांनी पाच वर्षातच तितकं कर्ज काढलं. असं असतानाही राज्यात काम का होत नाही? शिक्षणाच्या शिष्यवृत्ती मिळत नाहीत,’ असा प्रश्न अजित पवार यांनी केला आहे.

SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 01:28 PM IST

ताज्या बातम्या