'उद्धव ठाकरे आता आखाड्यात आले, त्यांची आता काही सुटका नाही' शरद पवारांचं सूचक ट्वीट

'उद्धव ठाकरे आता आखाड्यात आले, त्यांची आता काही सुटका नाही' शरद पवारांचं सूचक ट्वीट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदासाठी फायनल करण्यात आलं. त्यानंतर मात्र, राज्यात वेगळाच जल्लोष आहे. याच पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा पाऊस होतोय. अशाच शुभेच्छा शरद पवार यांनीदेखील दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर 4 दिवसांचं फडणवीस सरकार कोसळलं. त्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी आज तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदासाठी फायनल करण्यात आलं. त्यानंतर मात्र, राज्यात वेगळाच जल्लोष आहे. याच पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा पाऊस होतोय. अशाच शुभेच्छा शरद पवार यांनीदेखील दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे आता आखाड्यात आले आहेत. त्यांची आता काही सुटका नाही. अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी ट्वीटकरून शुभेच्छा दिल्या आहेत. 'आमचे अनेक सहकारी बाहेरून मार्गदर्शन करत असायचे. आता ते आखाड्यात आले आहेत. त्यांची आता काही सुटका नाही. मात्र तुमची-आमची जबाबदारी आहे की त्यांना या कामात यश मिळावं.' असं पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हॉटेल ट्रायडेंटमध्ये महाविकासआघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी बडे नेते आणि आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते.

इतर बातम्या - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी घेणार 'हा' निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या या बैठकीत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील असा ठराव मांडला. त्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी एकमताने मंजूरी दिली. तर आपणही मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता राज्यात ठाकरे सरकार येणार हे निश्चित आहे.

मोठी बातमी - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री..., महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची लिस्ट

दरम्यान, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार तर मग उपमुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार यावर सध्या दोन नावं पुढे येत आहेत. जयंत पाटील किंवा बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांच्या नावांची उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चा आहे. त्यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, 1 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं या बैठकीत ठरलं आहे.

First published: November 26, 2019, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading