Home /News /maharashtra /

गोपीचंद पडळकरांना उत्तर देण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा जुनं शस्त्र वापरलं!

गोपीचंद पडळकरांना उत्तर देण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा जुनं शस्त्र वापरलं!

पार्थ पवारने निवडणूक लढवावी ही सर्वांची इच्छा होती. त्यांच्या उमेदवारीसाठी अनेकांनी आग्रह धरला होता. शेतकरी कामगार पक्षाने देखील पार्थच्या उमेदवारीबाबत आग्रह केला होता

पार्थ पवारने निवडणूक लढवावी ही सर्वांची इच्छा होती. त्यांच्या उमेदवारीसाठी अनेकांनी आग्रह धरला होता. शेतकरी कामगार पक्षाने देखील पार्थच्या उमेदवारीबाबत आग्रह केला होता

शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर 'हल्ला' करण्यासाठी आपलं जुनंच शस्त्र वापरलं.

जेजुरी, 13 फेब्रुवारी : जेजुरी इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र या कार्यक्रमाआधी मोठं राजकीय नाट्य घडलं आणि वातावरणही तापलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाआधीच या परिसरात दाखल होत पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला. नियोजित कार्यक्रमाआधी गोंधळ घालणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर आज शरद पवार काय बोलणार, याची राज्यभर उत्सुकता होती. मात्र शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर 'हल्ला' करण्यासाठी आपलं जुनंच शस्त्र वापरलं. आक्रमक टीका आणि शरद पवार शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला 50 वर्ष उलटून गेली आहेत. यादरम्यान पवार यांच्यावर अनेकदा सणसणाटी आरोप झाले तर कधी विखारी टीकाही झाली. मात्र या सगळ्यांवर पलटवार करण्याऐवजी शरद पवार एकच शस्त्र वापरत राहिले. कितीही आरोप झाले आणि टीका झाली तरी त्याचा उल्लेखच न करता समोरच्या व्यक्तीला अनुल्लेखाने मारणे, हेच ते पवारांचं हुकमी अस्त्र. जेजुरीत आज झालेल्या कार्यक्रमातही शरद पवार यांनी हेच अस्त्र वापरत गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख करणंच टाळलं. गोपीचंद पडळकरांची राजकीय दिशा ठरली! विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले गोपीचंद पडळकर हे वारंवार शरद पवार यांच्यावर आक्रमक टीका करत आहेत. 'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत...ते जातीयवादी आणि भ्रष्टाचारी आहेत,' अशी जहरी टीका असो वा त्यांच्या नियोजित कार्यक्रमाआधी घातलेला गोंधळ. गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली नवी राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. शरद पवार हेच आपलं लक्ष्य असणार, हे गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. हेही वाचा - राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं अनावरण, महादेव जानकरांकडून शरद पवारांचं कौतुक पडळकरांच्या शैलीला यश येणार की पवार आसमान दाखवणार? शरद पवार यांच्यावर टोकदार टीका करत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर यांच्याकडून केला जात असल्याचं दिसत आहे. आगामी काळातही ते याच भूमिकेतून पाऊलं टाकतील, अशीही शक्यता आहे. त्यामुळे पडळकर यांच्या या राजकीय शैलीला यश येतं की राजकारणाच्या मैदानात जुने खेळाडू असलेले शरद पवार गोपीचंद पडळकर यांचा हा प्रयत्न हाणून पाडत त्यांना आसमान दाखवणार, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Gopichand padalkar, Sharad pawar

पुढील बातम्या