कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्येवर शरद पवार फेसबुक पेजवरून जनतेशी साधणार संवाद

कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्येवर शरद पवार फेसबुक पेजवरून जनतेशी साधणार संवाद

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे महाभयानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे महाभयानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण व्हावी, त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आपल्या फेसबुक पेजवर आज (27 मार्च) सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

राज्यातील वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा व सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा आव्हानांबाबत शरद पवार आपल्या फेसबुक पेजवर बोलणार आहेत.

हेही वाचा... जुन्नर तालुक्यात शहरातून गावात आलेल्या 19 हजार लोकांना करणार होम क्वारंटाईन

कोरोना बाधित रुग्णांबाबत शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय

देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या आता 125 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोना बधितासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा..कोरोनामुळे पंढरपुरात 400 वर्षांची परंपरा खंडीत, चैत्र वारीचा सोहळा रद्द

शरद पवार यांनी याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी सारखं पाऊल उचलावे लागले आहे. त्यामुळे लोकांचा रोजगार बुडाला आहे. शेती व उद्योगधंद्यांवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या अभूतपूर्व संकटावेळी राष्ट्रवादी पक्ष जनतेसोबत आहे, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा...कोरोना झाल्याचा आरोप करत मराठवाड्यात एकाच कुटुंबातल्या तिघांना बेदम मारहाण

राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदार म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा य उद्देशाने राज्य विधिमंडळातील विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर संसदेतील लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीत देण्यात येणार आहे. सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्याचे सर्व आमदार आणि खासदारांना कळवण्यात आले आहे.

First published: March 27, 2020, 12:20 AM IST

ताज्या बातम्या