रत्नागिरी: राष्ट्रवादी शिवसेनेला करणार 'चेकमेट'; रिंगणात आणणार तगडा उमेदवार

रत्नागिरी: राष्ट्रवादी शिवसेनेला करणार 'चेकमेट'; रिंगणात आणणार तगडा उमेदवार

गुहागर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच कुणबी समाजाचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. सहदेव बेटकर हे सध्याचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

  • Share this:

गुहागर (रत्नागिरी) 23 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा आपली जागा टिकवण्यासाठी राष्ट्रवादीने आता चांगलाच जोर धरला आहे तर नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मैदानात आहे. विधानसभेच्या गुहागार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस जबरदस्त खेळी करणार असल्याची चिन्ह आहे. भास्कर जाधव यांना टक्कर देण्यासाठी जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतच्या सूत्रांनी दिली आहे.

गुहागर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच कुणबी समाजाचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. सहदेव बेटकर हे सध्याचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. सहदेव बेटकर आणि राष्ट्र्रावादी काँग्रेस प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीमुळे गुहागर विधानसभा मतदार संघात राजकीय खळबळ उडाली आहे. बेटकर यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत शिवसेनेविरोधात उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे गुहागारमध्ये शिवसेना धोक्यात असल्याचं चिन्ह आहे.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत यांच्या उपस्थित भास्कर जाधव यांनी 'शिवबंधन' बांधलं. त्यामुळे शिवसेना गुहागारमध्ये भास्कर जाधव यांनी उमेदवारी देण्याची शक्यता आहे. असं झालं तर राष्ट्रवादी बेटकर यांना पक्षात घेत जाधव यांच्याविरोधात उमेदवारी देण्यार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आज दिवसभरात या 5 महत्त्वाच्या घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष...!

राष्ट्रवादी सोडणाऱ्या जाधवांवर झाली होती सडकून टीका

भास्कर जाधव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा भास्कर जाधवांकडून करण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भास्कर जाधवांचा दावा खोडून काढत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

'भास्कर जाधव यांना पक्षाने खूप काही दिले. शिवसेनेतून आल्यानंतर त्यांना पवारसाहेबांनी विधान परिषदेवर घेतलं, मंत्रिपद दिलं आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पददेखील दिलं. असं असताना ते पुन्हा सेनेत जात आहेत, यांचं आम्हाला दुःख आहे. मात्र, जिल्ह्यात एक दोन जिल्हा परिषद सदस्य वगळता त्यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. तसा ते करत असलेला त्यांचा दावाही खोटा आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीच्या जिल्हाधक्षांनी भास्कर जाधवांवर टीकास्त्र सोडलं होतं.

इतर बातम्या - 'पुतण्याला बक्षिस देण्यासाठी शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंचं घर फोडलं'

...तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही - शरद पवार

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना फैलावर घ्यायला सुरुवात केली आहे. जे नेते सोडून गेले त्यांच्याच गावात जावून पवार कार्यकर्त्यांना भेटत आहे. 15-20 वर्ष जे पवारांसोबत होते असं निष्ठावान समजले जाणारे अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडलं आहे. ही पडझड रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी शरद पवार राज्यांच्या झंझावती दौऱ्यावर आहेत. जालन्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी पक्ष सोडणाऱ्या चांगलाच दम भरला होता.

इतर बातम्या - दगाबाजी करू नका, आमचे उमेदवार तयार आहेत; शिवसेनेचा स्वबळाचा इशारा

पवार म्हणाले, पक्ष बदलणारे म्हणताय विकास करायचा म्हणून तिकडे चाललो, मग 15-15 वर्ष मंत्रिपद असून काय केलं. विकासाच्या नावावर पक्ष सोडणाऱ्यांनो थोडे दिवस थांबा, तुम्ही आणि मी आहोत. फक्त बटन दाबायची वेळ येऊ द्या, मग यांचा विकास कुठे पाठवायचा ते आपण ठरवू. कुठे पळापळ झाली तरी जालन्यातील राष्ट्रवादीचा कोणीही कुठे जाणार नाही याचा मला विश्वास आहे. असं त्यांनी सांगितलं होतं.

VIDEO: 26 सप्टेंबरपासून 5 दिवस बँका बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

Published by: Renuka Dhaybar
First published: September 23, 2019, 8:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading