शिवसेनेची पॉवर पवारांच्या पाठीशी? संजय राऊत म्हणाले...

शिवसेनेची पॉवर पवारांच्या पाठीशी? संजय राऊत म्हणाले...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनंतर आता शिवसेनेनंही शरद पवारांची पाठराखण केली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आज सक्तवसुली संचलनालय (ED) कार्यालयात चौकशीसाठी स्वत: उपस्थित राहणार आहेत. आज ईडी कार्यालयात न येण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र पवार आपल्या निर्णयावर ठाम असून दुपारी 2 वाजता ते ईडी कार्यालयात दाखल होतील. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांची आज चौकशी होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे.

तक्रारदार, अण्णा हजारे यांच्यानंतर आता शिवसेनेनंही शरद पवारांना क्लीन चिट दिली आहे.'शरद पवारांची विचारसरणी वेगळी असली तरीही ईडीनं त्यांच्यासोबत जे केलं ते चुकीचं आहे. या प्रकरणावरुन विधानसभेत चर्चा झाली मात्र त्यामध्ये कुठेही शरद पवारांचं नाव नव्हतं. या गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार दाखल केली गेली तेव्हा शरद पवारांचं नाव कुठेही नव्हतं असं तक्रारदारचं म्हणणं होतं. त्यानंतर भ्रष्टाचाराविरोधात लढणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शरद पवारांची पाठराखण केली.'

अण्णा हजारेंनी शरद पवार यांची पाठराखण करत त्यांना क्लीनचीट दिली आहे. अण्णांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकार आणि सरकारी यंत्रणा कामाला लागतात, हा नेहमीचा अनुभव आहे. तर दुसरीकडे ईडीनं गुन्हा दाखल केल्यानं शरद पवार अडचणीत आलेत. राज्य सहकारी बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंनी पुरावे सादर केले होते. मात्र त्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचं नावच नसल्याचं खुद्द अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं. अण्णा हजारे शरद पवारांना क्लीनचीट देऊन थांबले नाहीत. तर माझ्याकडील पुरावे चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करुनही त्यांनी याप्रकरणी कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आपल्याकडील पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नव्हते. तरीही त्यांचे नाव यामध्ये कसे आले हे आपल्याला माहिती नाही. पवारांचा जर याच्याशी संबंध नसेल आणि तरीही त्यांचे नाव पुढे आलं असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असंही अण्णांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणी मुंबईसह राज्यभरात तणावाचं वातावरण आहे. अनेक भागांमध्ये आज बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलनं, घोषणाबाजी, रास्तारोको केला जात आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली-नांदेड रस्त्यावरील खटकाळी बायपास रोडवर टायर जाळून रस्तारोको आंदोलन केले.  राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव जावेद राज यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी  केली.'शरद पवारांसाठी राज्यभरातून कार्यकर्ते शांततेनं येत आहेत. तरीही पोलीस कार्यकर्त्यांची धरपकड करत आहेत. देशातील लोकशाही संपत चालली आहे. विनाकारण जर पोलीस कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत असतील तर आम्ही सहन करणार नाही.' अशी आक्रमक भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

VIDEO: '...तर आम्ही सहन करणार नाही', पवारांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading