'मुख्यमंत्र्यांना सांगा आमच्या बापात दम आहे', जाहीर सभेत शरद पवार आक्रमक

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं पण इथे कसलीच प्रगती झालेली नाही. नाशिक करांना विचारलं की तुमचा दत्तक बाप कुठे आहे? आता नाशिकला दत्तक बापाची गरज नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 02:05 PM IST

'मुख्यमंत्र्यांना सांगा आमच्या बापात दम आहे', जाहीर सभेत शरद पवार आक्रमक

नाशिक, 18 ऑक्टोबर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी अवघे 2 दिवस उरले असताना आता प्रचारांच्या रणधुमाळीला वेग आला. सध्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गाजत आहेत. अशात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं पण इथे कसलीच प्रगती झालेली नाही. नाशिक करांना विचारलं की तुमचा दत्तक बाप कुठे आहे? आता नाशिकला दत्तक बापाची गरज नाही. आमच्या बापात दम आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. एका वृतवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ते नाशिकमध्ये झालेल्या आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते.

इतकंच नाही तर मुख्यमंत्री तुमचा बाड-बिस्तार आवरा आता तुम्हाला 24 तारखेला परत नागपूरला जायचं आहे असा इशाराही शरद पवार यांनी दिला आहे. यावेळी नाशिकमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. समोर कोणताचा पैलवान दिसत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवारांनी त्यांना चोख उत्तर दिलं आहे.

इतर बातम्या - Weather Update: मान्सूनची एक्झिट पण पाऊस सुरूच, आज या जिल्ह्यांत मुसळधार बरसणार!

मुख्यमंत्री म्हणतात समोर कोणी पैलवान दिसत नाही. पण 24 तारखेनंतर अंगाला तेल लावलेले पैलवान त्यांना दिसतील. मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला रेवड्यांवर खेळणार पोरगाही सरळ करेल अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना पवारांनी अमित शहा यांच्यावरही टीका केली. शरद पवारांनी इतक्या वर्षात काय केलं असा सवाल अमित शहा यांनी विचारला होता त्यावर शरद पवारांनी शहांवर टीका केली आहे.

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंवरील टीका भोवली, हर्षवर्धन जाधवांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Loading...

'अमित शहा यांना कोणी ओळखत तरी होतं का? मी सात वेळा विधानसभेवर होतो. 7 वेळा राज्यसभा-लोकसभेवर होतो. मी 4 वेळा मुख्यमंत्री पद भुषवलं आहे. केंद्रीय गृहमंत्री होतो. कृषी खातं साभांळलं. असं असताना कोण कुठले अमित शहा येऊन विचारतात मी काय केलं? मी काहीचं केलं नसतं तर माझा इतका सन्मान झाला असता का?' अशा शब्दात पवारांनी अमित शहांवर टीका केली.

इतर बातम्या - PMC बँक खातेधारकांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...