साताऱ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का, रामराजेंचा शिवसेना प्रवेश निश्चित?

साताऱ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का, रामराजेंचा शिवसेना प्रवेश निश्चित?

उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीला साताऱ्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

किरण मोहिते, सातारा, 13 सप्टेंबर : साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीला साताऱ्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादी सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे.

रामराजेंच्या उपस्थितीत आज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या एक मेळावा होणार आहे. या मेळाव्यातच ते आपल्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत सोडत असल्याने पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे.

राष्ट्रवादी सोडण्याचं नेमकं कारण कोणतं?

साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी काही दिवसांपूर्वी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला होता. मात्र आता एकाचवेळी दोन्ही राजे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या गोटात दाखल होत असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्यामागे नक्की आपआपसातील संघर्ष कारणीभूत आहे की वेगळेच काही कारण आहे, याबाबत आता चर्चा रंगत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना विशेष यश आलं नाही. कारण या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर रामराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले होते.

मुख्यमंत्री फडणवीस लेकीसोबत पोहोचले गिरगाव चौपाटीवर VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 13, 2019, 9:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading