शरद पवारांच्या उपस्थितीत रोहितची 'दंगल', विधानसभेच्या आखाड्याआधी नगरमध्ये तालीम

या स्पर्धेच्या माध्यमातून रोहित पवार कर्जतमध्ये विधानसभेसाठी मोर्चेबांधणी आणखी मजबूत करत असल्याची चर्चा आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 10:16 AM IST

शरद पवारांच्या उपस्थितीत रोहितची 'दंगल', विधानसभेच्या आखाड्याआधी नगरमध्ये तालीम

अहमदनगर, 18 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून रोहित पवार कर्जतमध्ये विधानसभेसाठी मोर्चेबांधणी आणखी मजबूत करत असल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे कर्जत-जामखेड या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर भाजप नेते आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचं तगडं आव्हान आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात राम शिंदे यांना चितपट करण्यासाठी रोहित पवार यांच्याकडून नगरमध्ये अनेक कार्यक्रमांद्वारे मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

कशी असेल कर्जतमधील 'महादंगल'?

रोहित पवार यांच्या 'सृजन' मार्फत कर्जत-जामखेड परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची "महादंगल" आयोजित केली आहे. कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात रविवारी 18 ऑगस्ट आणि सोमवार 19 ऑगस्ट रोजी कुस्तीची ही महादंगल होणार आहे.

18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या महादंगलीचे उद्घाटन होणार आहे. 18 तारखेला कर्जत आणि जामखेड तालुक्यातील 14 आणि 17 वयोगटातच्या आतील मल्लांची दंगल होणार आहे. तर 19 तारखेला भारत विरुद्ध इराण अशा आंतरराष्ट्रीय मल्लांची महादंगल होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील नामांकित मल्लांचीही महादंगल होणार आहे.

Loading...

या स्पर्धेत 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष  शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान,  विधानसभेच्या निवडणुकांना आता काही महिनेच राहिले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पवार कुटुंबातील तरुण पिढी आता राजकारणात सक्रीय होत आहे. पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर आता रोहित पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विधानसभेसाठी कर्जतमधून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी पक्षाकडे केली होती. नंतर त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे मुलाखतही दिली. त्यानंतर आता ते कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवतील हे निश्चित झालं आहे.

रोहित पवारांनी कर्जत भागात गेली काही वर्ष सतत दौरे करत कार्यकर्त्यांची फळीही तयार केली आहे. याआधी त्यांनी पुण्याच्या हडपसरमधूनही चाचपणी केली होती. मात्र अखेर त्यांनी आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कर्जत मतदारसंघावर शिक्कामोर्तब केलं.

SPECIAL REPORT: पवारांना धक्का देण्याची तयारी, बार्शीच्या राजकारणात चाललंय काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 10:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...