पंकजा मुंडेंना रोहित पवार म्हणाले.. धन्यवाद ताई! खिलाडूवृत्तीचंही केलं कौतुक

पंकजा मुंडेंना रोहित पवार म्हणाले.. धन्यवाद ताई! खिलाडूवृत्तीचंही केलं कौतुक

आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: पुण्यात ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या. बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या कार्यशैलीचं तोंडभरून कौतुक केलं.

'शरद पवार यांना सलाम. कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले...पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,' असं ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली.

हेही वाचा...शरद पवारांचा नाशिक दौरा, मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना घरातच केलं स्थानबद्ध

पंकजा यांच्या या ट्वीटवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभारही मानले आहेत. तसेच त्यांचा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्तीचं जाहीर कौतुकही केलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, 'धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा'. रोहित पवार यांना पंकजांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देवून एकाप्रकारे विरोधकांना टोला लगावला आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. मात्र, आता ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर प्रशंसा केली. त्यापाठोपाठ रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुंडे भाऊ-बहीण बसले एकमेकांच्या शेजारी... ..

राजकीय शत्रू असलेले पण नात्याने बहीण-भाऊ असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत एकत्र पाहायला मिळाले होतं. एवढंच नव्हे तर बैठकीत खुद्द शरद पवार यांच्या बाजूला धनंजय मुंडे हे आणि त्यांच्या शेजारी पंकजा मुंडे बसल्या होत्या. बैठक झाल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा मिनिटे दोन्ही बहीण-भाऊ एकमेकांशी चर्चा करत होते. दोनच दिवसापूर्वी दसऱ्या मेळाव्यांतर धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर टीका केली होती. मात्र, आजच्या बैठकीत हे दोघे बहीण-भाऊ मनमोकळ्या मनाने बोलत होते.

हेही वाचा..नितेश राणे यांनी कंगनाप्रकरणी ट्वीट करून उद्धव ठाकरे सरकारला पुन्हा डिवचलं!

समाजहिताच्या प्रश्नावर आम्ही दोघे एकत्र आलो तर यात वावगं काहीच नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले, तर आम्ही दोघे एकत्र आलो म्हणून काही चांगलं होण्याचा प्रश्न नाही, नाहीतर आमच्या पक्षांचा प्रॉब्लेम होईल, असं मिश्किलपणे उत्तर देत सध्यातरी आम्ही राजकारणात वेगवेगळेच राहू असं पंकजा यांनी स्पष्ट केलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 28, 2020, 1:16 PM IST

ताज्या बातम्या