शरद पवारांवरील भाजपच्या टीकेमुळे रोहित पवार संतापले, म्हणाले...

शरद पवारांवरील भाजपच्या टीकेमुळे रोहित पवार संतापले, म्हणाले...

'साहेबांचं राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवावं अस निश्चितच नाही. गेल्या 50 वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे.'

  • Share this:

मुंबई, 3 सप्टेंबर :  भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोलापूरमधील जाहीर सभेत जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना लक्ष्य केलं जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवरच टीकेचे बाण सोडले होते. भाजपकडून पवारांच्या योगदानाबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आहे. याबद्दल आता शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

'गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत. पण आत्ता बास झालं,' असं म्हणत रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'कधी कुठे आणि कशी सुरुवात करायची, लवकरच ठरवू,' अशी फेसबुक पोस्ट लिहित रोहित पवारांनी विधानसभेआधी रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

"साहेबांचं राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवावं अस निश्चितच नाही. गेल्या 50 वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले, त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करू शकतो. शेतीपासून ते IT पार्क उभा करण्यापर्यंतची ही शृंखला आहे.

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दीनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे.

सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकीपासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पीठ बदलण्याची भाषा आपण केली होती. जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमीनच नांगरायची वेळ आली आहे. चांगली मशागत करुन ठेवूया.

लवकरच ठरवूया, कधी कुठे आणि कशी सुरुवात करायची.

पण एक लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या मातीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची व विकासांच्या राजकारणाची श्रृखंला थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आपणा तरुणांनाच पुढे घेवून जावी लागणार आहे."

विश्वास नांगरे पाटील यांनी गणरायला काय घातलं साकडं?, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading