करमाळ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का, पवारांशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब सोडणार साथ?

करमाळ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का, पवारांशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब सोडणार साथ?

राष्ट्रवादीचे नेतृत्व आपल्या कामाची कदर करत नसल्याने रश्मी बागल पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

  • Share this:

विरेंद्रसिंह उत्पात, करमाळा, 18 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी विकासाचा मुद्दा पुढे करून भाजप सेनेत प्रवेश केला आहे. अशातच आता करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यादेखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच येत्या 20 ऑगस्टला रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीचे नेतृत्व आपल्या कामाची कदर करत नसल्याने रश्मी बागल पक्ष सोडणार आहेत, अशी माहिती त्यांचे बंधू आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली आहे. येत्या सोमवारी रश्मी बागल यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आता शिवबंधन बांधण्याची वेळ आली आहे, अशी फेसबुक पोस्ट दिग्विजय बागल यांनी लिहिली आहे.

दुसरीकडे, करमाळा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रवासाचे फोटो व्हायरल होत असून त्यावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,तानाजी सावंत, स्वर्गीय दिगंबरराव बागल, रश्मी बागल, दिग्विजय बागल यांचे फोटोही आहेत. 'आता शिवबंधन बांधूया हाती,' असा मजकूर असलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहेत रश्मी बागल ?

माजी मंत्री दिगंबरराव बागल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागी रश्मी बागल यांच्या मातोश्री शामल बागल यांना राष्ट्रवादीने तिकीट देत 2009 मध्ये आमदार केलं. दिगंबरराव बागल यांनी यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळातही काम केलं होतं. करमाळा विधानसभेला 2009 मध्ये माढा तालुक्यातील 36 गावे जोडली. राष्ट्रवादीने 2000 च्या निवडणुकीत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. पण अवघ्या 253 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात बँकेच्या संचालक म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली. सध्या रश्मी बागल यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ साखर कारखाने तसंच करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. दिगंबरराव बागल यांच्या राजकीय वारस म्हणून त्या राजकारणात वावरत आहेत. रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी मानल्या जातात. आदिनाथ आणि मकाई या साखर कारखान्यावर त्यांची सत्ता आहे.

शरद पवार यांच्या पुढाकाराने रश्मी बागल यांचा विवाह

बागल कुटुंब कायमच राष्ट्रवादीशी जोडलेलं आहे. करमाळा हे रश्मी बागल यांचे माहेर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने सासवड येथील साखर महासंघाचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांचे चिरंजीव उद्योगपती गौरव कोलते यांच्याशी विवाह झाला. माहेरातच त्यांनी राजकारणात स्थिरावण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आता बागल गट शिवसेनेत गेल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

करमाळ्यात दुहेरी धक्का?

लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवेले संजयमामा शिंदे हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. पूरग्रस्तांसाठी मदतनिधी देण्याचं कारण पुढे करत संजय शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यास संजयमामा शिंदे हे भाजपच्या तिकीटावर करमाळ्यातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे संजय शिंदे आणि रश्मी बागल यांनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो.

VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिंवत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 01:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading