शरद पवारांच्या जवळचाच नेता सोडणार साथ, दिग्गज नेत्याचा मुलगा भाजपमध्ये जाणार?

राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचीही चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 12:54 PM IST

शरद पवारांच्या जवळचाच नेता सोडणार साथ, दिग्गज नेत्याचा मुलगा भाजपमध्ये जाणार?

उस्मानाबाद, 12 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पदमसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचीही चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुरू झाली होती. आता बकरी ईदच्या शुभेच्छा देताना शेअर केलेल्या फोटोवर राणा पाटील यांनी आमदारपदाचा उल्लेख टाळला आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, सचिन अहिर या बड्या नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे. तसंच नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे मोठे नेते गणेश नाईक हेदखील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी अडचणीत आली आहे.

दरम्यान, नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचीच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.

SPECIAL REPORT: मधू इथे तर चंद्र तिथे; पुरामुळे नवरा-नवरी अडकले, लग्नाचा मुहूर्त टळला!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...