मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली, तरीही सोडून गेले', शरद पवारांनी बोलून दाखवली नाराजी

'राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली, तरीही सोडून गेले', शरद पवारांनी बोलून दाखवली नाराजी

जशी एकजूट विधानसभेला ठेवली तशीच कायम ठेवा. आपआपसात मतभेद ठेवू नका'

जशी एकजूट विधानसभेला ठेवली तशीच कायम ठेवा. आपआपसात मतभेद ठेवू नका'

जशी एकजूट विधानसभेला ठेवली तशीच कायम ठेवा. आपआपसात मतभेद ठेवू नका'

    अहमदनगर, 24 जानेवारी : 'राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली तरीही, पक्षाला सोडून गेले. अनेक जण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. पण जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाला' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar pichad) यांच्यावर टीका केली. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी गावात  माजी आमदार कै.स्व.यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावर शरद पवार यांच्या हस्ते पार पडले.  तसंच शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून चौफेर टोलेबाजी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. माथेरानच्या घाटात अपघाताचा थरार, जिप्सी दरीत कोसळणारच होती पण... 'स्व.यशवंतराव भांगरे यांनी अकोले तालुक्यासाठी मोठे काम केले आहे.  तालुक्याच्या विकासासाठी सगळे एकत्र आले. 'जशी एकजूट विधानसभेला ठेवली तशीच कायम ठेवा. आपआपसात मतभेद ठेवू नका', असा सल्ला शरद पवार यांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना दिला. 'पक्षात आलेल्या सर्वांना भरभरून दिले होते. काही जणांना राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली पण तरीही ते पक्षाला सोडून गेले. अनेकजण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाला', असं म्हणत शरद पवार यांनी मधुकर पिचड यांच्यावर टीका केली. OMG! एकाच बॉलवर दोन वेळा रन आऊट झाला 'हा' बॅट्समन, पाहा VIDEO 'पवनचक्कीसाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांना कंपनी मदत करत नाही ही खंत आहे.  इथल्या साखर कारखान्याने एवढे मोठे कर्ज वाढवून ठेवले आहे.  कारखान्याचे अस्तित्व टिकवायचे असेल तर झारीतले शुक्राचार्य बाजूला काढावा लागेल', असं म्हणत शरद पवार यांनी मधुकर पिचड यांचे नाव न घेता टीका केली. 'एकदा  कारखान्याची सत्ता ताब्यात घ्या, मी कारखाना अडचणीतून बाहेर काढतो, अशी ग्वाही सुद्धा शरद पवार यांची अकोलेतील नागरिकांना दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या