Home /News /maharashtra /

अखेर शरद पवारांना कोरोनानं गाठलं, तिसऱ्या लाटेत NCP अध्यक्ष Positive

अखेर शरद पवारांना कोरोनानं गाठलं, तिसऱ्या लाटेत NCP अध्यक्ष Positive

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP president) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची (Corona Positve) लागण झाली आहे.

    पुणे, 24 जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP president) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची (Corona Positve) लागण झाली आहे. सोशल मीडियावर ट्विट करुन त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. शरद पवार यांनी ट्विट करून माहिती दिली. कोरोनाची सौम्य लक्षण असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. तसंच संपर्कात असलेल्या लोकांनी टेस्ट करुन घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. ट्विटमध्ये काय म्हणाले शरद पवार माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी. राज्यातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली. यातल्या काही मंत्री आणि नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवारांसाठी जितेंद्र आव्हाडांचं ट्विट शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: NCP, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या