मोदींनी साडेतीन लाख कोटी मागितल्याने उर्जित पटेलांचा राजीनामा, जयंत पाटलांचा आरोप

मोदींनी साडेतीन लाख कोटी मागितल्याने उर्जित पटेलांचा राजीनामा, जयंत पाटलांचा आरोप

रिझर्व्ह बँकेचे साडेतीन लाख रुपये नरेंद्र मोदी यांनी मागितल्याने उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. ज्याला अर्थशास्त्राचे ज्ञान नाही असा इतिहास तज्ज्ञ भारताचा गव्हर्नर केला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुलडाण्यात केलाय.

  • Share this:

अमोल गावंडे,

बुलडाणा, 17 एप्रिल- रिझर्व्ह बँकेचे साडेतीन लाख रुपये नरेंद्र मोदी यांनी मागितल्याने उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. ज्याला अर्थशास्त्राचे ज्ञान नाही असा इतिहास तज्ज्ञ भारताचा गव्हर्नर केला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुलडाण्यात केलाय.

जयंत पाटील यांनी आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ खामगाव येथे सभा घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2014 पर्यंत देशावर 51 लाख कोटी रुपये कर्ज होते. आता देशावर 82 लाख कोटींचे कर्ज आहे. म्हणजेच या पाच वर्षांत मोदींनी देशावर 31 लाख कोटी कर्ज केले हा खर्च मोदींनी कुठे केला, याचा देशाला हिशोब द्यावा, असेही ते यावेळी म्हणाले. जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अमित शहा यांच्या निवडणूक पूर्वीचे मागील आणि आताच्या व्हिडीओ दाखवत प्रचार केला.

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की, एका पक्षाचे?

'मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की, एका पक्षाचे? असे ताशेरे न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ओढले होते, असं सांगली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी सांगितले होते. दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नसल्यामुळेच न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले होते. न्यायालयाने ओढलेल्या या ताशेऱ्यावरून मुख्यमंत्र्यानी गृहखाते कसे सांभाळले हे समजून येतं. मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था काशी सांभाळली याचं सर्टिकफिकेत न्यायालयाने दिलं आहे,' असंही ते म्हणाले होते.

VIDEO: सांगलीत भाजपच्या प्रचारासाठी आता वासुदेवच आला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 07:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading