मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या नेत्यानेच सरकारला दिला घरचा अहेर

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या नेत्यानेच सरकारला दिला घरचा अहेर

गृहमंत्री किंवा स्थानिक पोलीस कुणीही आपल्या तक्रारीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला आहे.

  • Published by:  Akshay Shitole

पिंपरी चिंचवड, 28 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी महाविकास आघाडी सरकारालाच घरचा अहेर दिला आहे आपल्या जीविताला काही जणांकडून धोका असल्याचं त्याचं म्हणणं आहे. तसंच वारंवार सांगूनही पक्षातील जेष्ठ नेते, गृहमंत्री किंवा स्थानिक पोलीस कुणीही आपल्या तक्रारीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला आहे.

नगरसेवक दत्ता साने यांनी जीविताला धोका असल्याचा आरोप करत त्याविरोधात आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. 7 जून 2019 रोजी साने यांच्या कार्यलयावर अज्ञातांनी सशस्त्र हल्ला केला होता. हल्ला करणारे सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केले होते. मात्र आता ते आरोपी जामिनावर सुटले आहेत.

जामीनावर सुटलेल्या आरोपींपासून आणि हल्ल्याच्या सुत्रधारापासून जीविताला धोका असल्याने साने यांचं म्हणणं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भोसरी विधानसभेचे स्थानिक आमदारच हल्ला करणाऱ्या मागे असल्याचा दावाही साने यांनी केल्याने शहरातील राजकीय वातवरण चांगलंच तापण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत.

निलेश राणेंची थेट बाळासाहेब ठाकरेंवर घणाघाती टीका, मांडवली केल्याचा आरोप

दरम्यान, पिंपरी चिंचवड हा एकेकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गड मानला जात होता. गेल्या काही दिवसांमध्ये इथं राष्ट्रवादीला अपयश येत आहे. मात्र याच पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकानेच सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी दर्शवत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीकडे राज्य सरकार किंवा स्वत: अजित पवार लक्ष देणार का, हे पाहावं लागेल.

First published:

Tags: Ajit pawar, Pimpari chinchwad