मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : जितेंद्र आव्हाडांना ताब्यात घेणाऱ्या IPS अधिकाऱ्याला धक्काबुक्की, 24 तास उलटूनही कारवाई नाही

VIDEO : जितेंद्र आव्हाडांना ताब्यात घेणाऱ्या IPS अधिकाऱ्याला धक्काबुक्की, 24 तास उलटूनही कारवाई नाही

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काढलेल्या मोर्च्यात IPS अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्यात आली होती. विशेष म्हणजे संबंधित घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाहीय.

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काढलेल्या मोर्च्यात IPS अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्यात आली होती. विशेष म्हणजे संबंधित घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाहीय.

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काढलेल्या मोर्च्यात IPS अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्यात आली होती. विशेष म्हणजे संबंधित घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाहीय.

मुंबई, 2 जुलै : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काढलेल्या मोर्च्यात IPS अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होवून 24 तास उलटले तरी अजून या प्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाहीय. यामुळे पोलिसांवर दबाव आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चा दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या एका पदाधिकाऱ्याने जे कृत्य केले त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हिरव्या शर्टवाला व्यक्ती आयपीएस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करतोय. तरी देखील या प्रकरणी अजून कोणतीच कारवाई झाली नाहीय. तुम्ही व्हिडिओ जर नीट पाहिला तर लक्षात येईल. बराच वेळ रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी वाढू लागल्याने पोलीस मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घ्यायला गेले तेव्हा हिरव्या शर्टवाली एक व्यक्ती त्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या मागून आली आणि ती व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेणाऱ्या त्या आयपीएस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करु लागली. (महाविकास आघाडी सरकार असताना बारामतीकरांनी काय-काय पळवलं? विजय शिवतारेंचा यादी वाचत उद्धव ठाकरेंवर निशाणा) सुरुवातीला हे गर्दीमुळे होतंय असं वाटत असताना पुढे मात्र ती व्यक्ती त्या आयपीएस अधिकऱ्याला ढकलतच नेत होती. शेवटी ते आयपीएस अधिकाऱ्याला त्या हिरव्या शर्टवाल्या व्यक्तीने खाली ढकलत खाली पाडले. यानंतर आणखी लज्जास्पद म्हणजे आयपीएस अधिकारी खाली पडल्यावर हिरव्या शर्टवाल्या व्यक्तीने दोन्ही हात वर केले जसं काय त्याला खूप आनंदच झाला आहे. हा प्रकार घडताना तिथे उपस्थित काही पोलिसांनी देखील पाहिला आणि त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याला धक्का देणाऱ्या त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. या विषयी आम्ही पोलिसांनी बोललो तर त्यांनी त्यांवर बोलणे टाळले. धक्कादायक म्हणजे सर्व स्पष्ट दिसत असूनही पोलिसांनी यासंबंधी कोणतीही कारवाई केली नाहीय. हे पाहून आता भाजपाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी संताप व्यक्त केलाय. या व्हायरल व्हिडिओ बाबत जेव्हा आम्ही अधिक माहिती घेतली तेव्हा हिरव्या शर्टवाली व्यक्ती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाणे कार्यकारिणीची पदाधिकारी असून त्याचे नाव कैलास हावले आहे. संबंधित व्यक्ती अशा मोर्चात नेहमी पुढे असते. कालच्या मोर्चा दरम्यान देखील आमदार जितेंद्र आव्हाड हे स्वतः अनेकदा कैलासला बोलावत होते. एका व्हिडिओमध्ये तर कैलास हावले याच्या सोबत जितेंद्र आव्हाड चर्चा देखील करत आहेत. ती चर्चा मोर्चा बाबत किंवा काहीही विषयावर असू शकते. पण घडलेल्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही व्यक्तीने दिलगिरी व्यक्त केली नाहीय. मोर्चा काढणे आंदोलने करने हे राजकीय पक्षांचे मुलभूत हक्क आहेत. पण या दरम्यान मोर्चात सहज दिसणारे पोलीस कार्यकर्त्यांना दिसत नाहीत. कारण त्यांचे नेतृत्व पाठीशी आहे. आपलं कोण वाकडं करणार? असा गैरसमज कार्यकर्त्यांचा असतो. पण खाकी वर्दीवाल्यांचा यांत काय दोष? ते त्यांचे काम करत असतात. त्यांना अशी धक्काबुक्की करणे हे चूकीचेच आहे. आणि लक्षात ठेवा जनता गे सर्व बघत असते.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Bollywood, IPS Officer, Jitendra awhad, Thane

पुढील बातम्या