शरद पवार दैवत पण..., आणखी एक राष्ट्रवादी आमदार शिवसेनेच्या वाटेवर

शरद पवार दैवत पण..., आणखी एक राष्ट्रवादी आमदार शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात अनेक धक्के बसले. त्यानंतर आता विदर्भातही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झालं आणि आता दक्षिणी महाराष्ट्रातही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.

  • Share this:

पंढरपूर, 10 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.  विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात अनेक धक्के बसले. त्यानंतर आता विदर्भातही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झालं आणि आता दक्षिणी महाराष्ट्रातही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपक आबा साळुंखे यांनी राजीनामा दिला आहे. सांगोल्याचे माजी आमदार दिलीप आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

'मला सांगोला इथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. तशी मी पक्षाला मागणी सुध्दा केली. मला उमेदवारी देऊन पक्ष मला न्याय देईल ही अपेक्षा ठेवत आहे. पण मतदारसंघातील काम आणि जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचं काम या दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करणं शक्य नसल्यानं मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे' असं कारण दिलीप आबा साळुंखे यांनी दिलं. 'शरद पवार हे आमचे दैवत आहेत' असंही ते यावेळी म्हणाले. शरद पवारांवर प्रेम असलं तरी आता दिलीप आबा साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत 

महाराष्ट्रात सोमवारी आणखी एका पुतण्याची बंडखोरी पाहायला मिळाली. निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे रायगडात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अवधुत तटकरे यांनी मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

इतर बातम्या - झीरो डिग्री बारमध्ये लहान मुला-मुलींचा धिंगाणा, धाड टाकल्यावर धक्कादायक खुलासा

'गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांशी पक्षबदलाबाबत चर्चा सुरू होती. अजितदादा पवार यांच्याशी एकदा चर्चा झाली होती. माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे मांडल्या होत्या. पण मी पक्षबदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो. मी कोणावरही नाराज नाही. राजकीय महत्वकांक्षा काहीशी आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी पक्षात आलेलो नाही. तर काकांशी पक्षबदलाबाबत काहीही बोलणं झालेलं नाही.' अशी प्रतिक्रिया अवधूत तटकरे यांनी दिली आहे.

इतर बातम्या - भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

राष्ट्रवादीची अडचण, शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा मुलगा करणार शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित दोन दिवसात समीर देशमुख यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले समीर देशमुख हे सहकार महर्षी आणि माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत. प्रा. सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगाच आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याने पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे.

इतर बातम्या - पंकजा मुंडेंची राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका, विरोधकांना मत न देण्याचं आवाहन

दरम्यान, विविध जिल्ह्यांमध्ये पडझड होत असताना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. काँग्रेससोबत आघाडीचा फॉर्म्युला लवकरात लवकर निश्चित करून युतीसमोर आव्हान निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे सात उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे.

भयानक! रहिवासी इमारतीवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2019, 2:45 PM IST

ताज्या बातम्या