राणा जगजितसिंह यांच्यासह पद्मसिंह पाटलांच्या भाजप प्रवेशाची घोषणा

आमदार राणा पाटील यांच्यासह त्यांचे वडिल आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 02:31 PM IST

राणा जगजितसिंह यांच्यासह पद्मसिंह पाटलांच्या भाजप प्रवेशाची घोषणा

बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अखेर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. आमदार राणा पाटील यांच्यासह त्यांचे वडिल आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

'निर्णय घेण्यासाठी वेळ लागला पण आता निर्णय घ्यावा लागणार आहे. केसला घाबरून किंवा कुठल्या चौकशीला घाबरून हा प्रवेश करत नाही,' असा खुलासा भाजप प्रवेशाची घोषमा करतान राणा जगजितसिंह यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक आमदार राणा जगजीतसिंह पाटील राष्ट्रवादी सोडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आमदारांचा भाजप प्रवेश, कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीतच

राणा पाटील हे राष्ट्रवादीचे उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्षदेखील होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमाकडे जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे राणा पाटील यांच्या भाजपप्रवेशापासून राष्ट्रावादीचा मोठा वर्ग दूर राहिल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.

दरम्यान, 'मला तुमच्याशी काही बोलायचं आहे,' असं म्हणत राणा पाटील यांनी उस्मानाबादमध्ये पोस्टर्सही लावले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधत राणा पाटील आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील, हे आता आधीच नक्की झालं होतं.

Loading...

राणा पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांच्या सर्वात जुन्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. याआधी शरद पवार यांच्या राजकीय चढउताराच्या काळात पद्मसिंह पाटील यांनी त्यांना साथ दिली होती. यावेळी मात्र त्यांनी वेगळी वाट धरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

दरम्यान, राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुरू झाली होती. अखेर आता राणा पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे.

SPECIAL REPORT : सर्ज्याला धुण्यासाठी बादलीभर पाणी, पोळ्याला बळीराजाच्या डोळ्यात अश्रू!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...