Home /News /maharashtra /

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड

NCP Office vandalised: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सोलापूर, 1 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड (NCP office vandalise) करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न दोन इसमांनी केला आहे. रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला (Ramlal Chauk Solapur) करण्यात आला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती. गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. गाडीवर हल्ला करणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता. पडळकरांनी बुधवारी शरद पवारांवर केली होती टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. आज दुपारी सुद्धा शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार हे मी लहान असल्यापासून ऐकतोय की ते पंतप्रधान होणार आहेत. मागील 30 वर्षांपासून ते भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. दिल्लीत हे नेते एकत्र जमले हे म्हणजे असं झालं की रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली होती. 'पडळकरांच्या गाडीवर हल्ला हा भाजपने घडवून आणलेला स्टंट' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं, जी घटना झाली ही कुठल्याही सन्माननीय सदस्याच्या गाडीवर होऊ नये, मात्र, हा भारतीय जनता पक्षाकडून घडवून आणलेला स्टंट आहे. अशा प्रकारचा स्टंट घडवून आणायचा आणि स्वत: प्रकाश झोतात यायचं. मग, सुरक्षेची मागणी करायची. शरद पवारांवर ज्या पातळीवर टीका करण्यात आली ती भाषा हलकटपणाची म्हणता येते. हलकटपणाची भाषा करुन टीका करणाऱ्यांनी पब्लिसिटी करणाऱ्या भाजपने शहानपणा शिकवू नये.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Gopichand padalkar, NCP, Solapur

पुढील बातम्या