मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विधानसभा अध्यक्ष ठरेना! काँग्रेसच्या 'या' नेत्याची राष्ट्रवादीला अडचण

विधानसभा अध्यक्ष ठरेना! काँग्रेसच्या 'या' नेत्याची राष्ट्रवादीला अडचण

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असून उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र अद्याप खातेवाटप आणि विधानसभा अध्यक्षाचा निर्णय महाआघाडीला घेता आलेला नाही.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी मंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदाचा घोळ अद्याप महाआघाडीला सोडवता आलेला नाही. आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. मात्र या नावाला राष्ट्रवादीचा आक्षेप असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, काँग्रेसकडून इतर नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीतील अंतर्गत धूसफूस आता वारंवार चव्हाट्यावर येत असून त्यामुळेच अजित पवार आज शपथ घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्कवर संध्याकाळी 6.40 ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रावादीने पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर सहमती न दर्शवल्यानं आता केसी पडवी आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावावर विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांपैकी एकजण विधानसभा अध्यक्ष तर एकाकडे मंत्रिपद दिलं जाईल. याशिवाय आज अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेना-राष्ट्रावादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 26 नेते मंत्री असतील असं सांगितलं जात आहे. यात संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये सेनेचे 8, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 9 नेत्यांची नावे समोर आली आहेत.

वाचा : 'ठाकरे' आडनाव हे एका ब्रिटिश कादंबरीकाराचे, वाचा काय आहे इतिहास

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी शिवाजी पार्कवर सुरू आहे. या सोहळ्याला ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अशोक गहलोत, कमलनाथ, चंद्राबाबू नायडू, एचडी देवेगौडा यांच्यासह सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. याशिवाय क्रिकेटपटू, चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनाही आमंत्रित केलं आहे.

वाचा : डोंबिवलीची लेक होणार महाराष्ट्राची फर्स्ट लेडी!

First published:

Tags: NCP, Prithviraj Chavan