अडसुळांनी शिवसेना संपवली, लोकांचे जीवही घेतले; नवनीत राणांचा हल्लाबोल

अडसुळांनी शिवसेना संपवली, लोकांचे जीवही घेतले; नवनीत राणांचा हल्लाबोल

'आनंदराव अडसूळांनी स्थानिक शिवसैनिकांना घरी बसवलं तर काहींचे जीव घेतले.' असा जहाल आरोप आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर जाहीर भाषणात केला आहे.

  • Share this:

अमरावती, 16 एप्रिल : दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अवघा 2 दिवस उरला असताना अमरावतीमध्ये आता राजकारण तापलं आहे. आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना संपवली आणि काही लोकांचे जीव घेतले अशा शब्दात नवनीत राणा यांनी टीका केली आहे.

'शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ हे या जिल्ह्याचे नाही. या मतदारसंघात त्यांचं नावसुद्धा नाही. त्यांना अमरावतीशी काही घेणं-देणं नाही. त्यांनी जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना संपवली असून केवळ अडसूळ सेना निर्माण केली.' असा प्रहार नवनीत राणा यांनी केला.

'आनंदराव अडसूळांनी स्थानिक शिवसैनिकांना घरी बसवलं तर काहींचे जीव घेतले.' असा जहाल आरोप आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर जाहीर भाषणात केला आहे. त्यांच्या या भाषणाची अमरावतीत एकच चर्चा आहे.

मतदानाला 2 दिवस असताना नवनीत राणांमुळे अमरावतीत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

अवघे दोन दिवस उरले असताना अमरावतीमधील लोकसभा निवडणूक पुढे ढकला अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पाठींब्यावरील उमेदवार नवनीत राणा यांच्या जात वैधतेच्या संदर्भात येत्या 22 तारखेला निर्णय होणार आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रार देण्यात आली आहे.

हेही वाचा: नागपूर डबल मर्डरचा 8 तासात खुलासा, मुलीनेच प्रियकरासोबत केला खून

अमरावतीमधील ऍड. सिद्धार्थ गायकवाड यांनी केली निवडणूक आयोगाला अशी तक्रार दिली आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये अमरावतीमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवार नवनीत राणा यांनी जोरदार प्रचारदेखील केला आहे. पण निवडणूक पुढे ढकलण्याच्या या तक्रारीमुळे आता वेगळाच वाद अमरावती मतदारसंघात निर्माण झाला आहे.

दुर्गम मेळघाटात सुनिल शेट्टींचा नवनीत राणांसाठी रोड शो

आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी यांनी मेळघाटातील धारणी येथे रोड शो केला होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात अतिशय दुर्गम आणि आदिवासी बहुल असलेला मेळघाटात हा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवारांसाठी नेहमीच निर्णायक ठरतो.

'जो व्यक्ती लोकांच्या विकासासाठी झटतो, ज्या उमेदवाराची विजयी होण्याची मला खात्री असते त्याच्याच प्रचारासाठी मी जात असतो म्हणून या वेळी मेळघाटातील आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी नवनीत राणा यांना खासदार म्हणून निवडून द्या' असं आव्हान सुनिल शेट्टी यांनी केलं. सुनील शेट्टी यांनी चिखलदरा, सेमाडोह, धारणी आणि चुरणी इथेसुद्धा रोड शो केला.

मेळघाटातील अनेक प्रश्न शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सोडवले नसून आदिवासींचे वीज, पाणी, रस्ते, कुपोषण, पुनर्वसन यांसारखे मुलभूत प्रश्न  सोडवण्यासाठी नवनीत राणा प्रयत्न करतील असं शेट्टी म्हणाले.

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीचं नातं आहे. कुठल्याही अडचणीच्या काळात ते मदतीसाठी तत्पर असतात असंही सुनिल शेट्टींनी सांगितलं.

VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!

First published: April 16, 2019, 10:21 AM IST

ताज्या बातम्या