खळबळजनक! एअर इंडियाच्या विमानामध्ये NCP खासदाराच्या जेवणात आढळलं अंड्याचं कवच!

खळबळजनक! एअर इंडियाच्या विमानामध्ये NCP खासदाराच्या जेवणात आढळलं अंड्याचं कवच!

1 ऑक्टोबर रोजी वंदना या पुण्याहून दिल्लीला विमानाने जात होत्या. प्रवासावेळी त्यांनी ऑमलेट मागवलं होतं.

  • Share this:

पुणे, 08 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या खाण्यात अंड्याचं कवच आढळल्याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित केटररला दंड ठोठावला आहे. 1 ऑक्टोबर रोजी पुण्याहून दिल्लीला विमानाने जात असताना वंदना चव्हाण यांच्या खाण्यात अंड्याचं कवच आढळलं होतं. यासंबंधी वंदना यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला होता. त्यांच्या या ट्विटची एअर इंडियाने दखल घेत संबंधित केटररवर कारवाई करण्यात आली आहे.

1 ऑक्टोबर रोजी वंदना या पुण्याहून दिल्लीला विमानाने जात होत्या. प्रवासावेळी त्यांनी ऑमलेट मागवलं होतं. त्यात त्यांना अंड्याच्या कवचाचे तुकडे आढळले होते. त्यानंतर त्यांनी त्याचे फोटो काढून त्यासंबंधी ट्विट केलं होतं. ट्विटरवरून त्यांनी यासंबंधी संताप व्यक्त करत एअर इंडिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, डीजीसीए, नागरी उड्डाण मंत्रालयालाही टॅग केलं होतं.

याआधी एअर इंडियाच्या खाण्यात काहीना-काही आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'ब्रेकफास्टला मी ऑमलेट मागवलं. तीन-चार घास खाऊन झाल्यावर अंड्याच्या कवचाचे तुकडे त्यात दिसले. हे कमी म्हणून की काय, कुजलेले बटाटे, अर्धवट शिजलेले दाणे, जॅमच्या डब्यावर पांढुरकी पावडर अशा गोष्टीही निदर्शनास आल्या.'

दरम्यान, एअर इंडियाकडून या ट्विटची दखल घेत भविष्यात अशा चुका होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  संबंधित केटररला दंड म्हणून हँडलिंग चार्जेस आणि संपूर्ण फ्लाईटच्या खाद्यपदार्थाची रक्कम देण्यास सुनावण्यात आली असल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 8, 2019, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading