उदयनराजे आजच खासदारकीचा राजीनामा देणार? दिल्लीत हालचाली

उदयनराजे आजच खासदारकीचा राजीनामा देणार? दिल्लीत हालचाली

खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश नक्की झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश नक्की झाला आहे. त्यामुळे आज उदयनराजे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी उदयनराजे संध्याकाळी दिल्लीत दाखल होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला उदयनराजेंबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. खासदारकीचा आज राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांचा उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्य उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी माहिती आहे. तसंच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत ते सहभागी होणार आहेत.

दरम्यान, भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला विलंब झाला. मात्र आता उदयनराजे भाजपमध्ये जाण्यास तयार झाले असल्याची माहिती आहे. असं असलं तरीही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

भाजप प्रवेश केल्यास उदयनराजेंसमोर निर्माण होऊ शकतात 'ही' आव्हानं

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.

भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप प्रवेश नक्की करण्यासाठी उदयनराजे यांनी पुरेसा वेळ घेतला.

शिवेंद्रराजेंचा गणपती मिरवणुकीत तुफान डान्स, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 13, 2019, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading