शरद पवारांच्या भेटीनंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश ठरला? तारखही निश्चित

रद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 07:19 PM IST

शरद पवारांच्या भेटीनंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश ठरला? तारखही निश्चित

मुंबई, 12 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश अखेर निश्चित झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादीतच थांबतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय पक्का झाला असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे. येत्या रविवारी म्हणजेच 15 सप्टेंबरला उदयनराजे हाती कमळ घेतील, अशी शक्यता आहे.

दरम्यान, भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला विलंब झाला. मात्र आता उदयनराजे भाजपमध्ये जाण्यास तयार झाले असल्याची माहिती आहे. असं असलं तरीही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

भाजप प्रवेश केल्यास उदयनराजेंसमोर निर्माण होऊ शकतात 'ही' आव्हानं

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती.

Loading...

'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप प्रवेश करण्यासाठी उदयनराजे यांनी पुरेसा वेळ घेतला. आता उदयनराजे खरंच भाजपमध्ये दाखल होणार का, हे पाहावं लागेल.

मिरवणुकीत चंद्रकांत खैरे आणि अतुल सावेंनी धरला ठेका, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...