'...तर मी खासदारकीचा राजीनामा देतो', उदयनराजेंची आक्रमक भूमिका

'...तर मी खासदारकीचा राजीनामा देतो', उदयनराजेंची आक्रमक भूमिका

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • Share this:

सातारा, 22 जून : 'सातारा लोकसभेचा मी राजीनामा देतो. निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी,' असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार? असा संतप्त सवालही उदयनराजे यांनी विचारला आहे.

'ईव्हीएम मशीन्सद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही,' अशा आक्रमक शब्दांत उदनराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी ईव्हीएम मशीन्सवर आक्षेप नोंदवला. या यादीत आता उदयनराजेंच्या नावाचीही भर पडली आहे. त्यामुळे आगामी काळातही या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ईव्हीएमवर अनेकांचा आक्षेप

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. या मताधिक्क्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी महाराष्ट्रभर 'EVM हटावो, देश बचावो' पुकारले आहे. राज्यभरात जिल्हा आणि तालुका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं.

EVMबाबत आरोप

लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत EVM आणि VVPATमधील 50 टक्के मतांच्या मोजणीची मागणी केली होती. तर, निकालानंतर खासदार नारायण राणे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच काँग्रेसच्या काही नेत्यांनी EVMमध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता.

VIDEO : महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading