माझ्यावर प्रेम करणारी एवढी येडी असताना मला ED ची भीती कशाला? उदयनराजेंची टोलेबाजी

'माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी असताना मला ईडीची भीती कशी वाटेल.'

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 03:42 PM IST

माझ्यावर प्रेम करणारी एवढी येडी असताना मला ED ची भीती कशाला? उदयनराजेंची टोलेबाजी

मुंबई, 3 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके शैलीसाठी ओळखले जातात. सध्या महाराष्ट्रात पक्षांतराने वेग पकडला आहे. उदयनराजेही भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. 'सत्ताधारी भाजप 'ईडी'ची भीती दाखवून विरोधातील नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहे,' असा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

'तुम्हालाही ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये जाण्यास भाग पाडण्यात येत आहे का,' असा प्रश्न उदयनराजेंनाही विचारण्यात आला. यावर उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली आहे. 'माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी असताना मला ईडीची भीती कशी वाटेल,' अशी मिश्कील प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरून गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडत आहेत. उदयनराजे भाजपमध्ये दाखल होणार की राष्ट्रवादीतच राहणार, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. त्यामुळे आपल्या बेधडक स्वभावासाठी परिचित असणारे उदयनराजे आपल्या राजकीय वाटचालीबाबत सावध पाऊलं का टाकत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

उदयनराजे भोसले यांनी पक्ष सोडणं राष्ट्रवादीसाठी अडचणीचं ठरू शकतं. कारण सातारा लोकसभा मतदारसंघातील उदयनराजेंच्या पाठीमागे असणारा मोठा मतदार राष्ट्रवादीपासून दूर जाईलच, शिवाय महाराष्ट्रभर उदयनराजेंना मानणारा जो मोठा वर्ग आहे तो देखील दुरावण्याची राष्ट्रवादीला भीती आहे. त्यामुळेच आधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि नंतर खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

काय आहे उदयनराजेंसमोरील आव्हान?

Loading...

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी गणरायला काय घातलं साकडं?, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...