फडणवीस आणि मोदी नाही...उदयनराजेंच्या मते हे लोक आहेत खरे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान

फडणवीस आणि मोदी नाही...उदयनराजेंच्या मते हे लोक आहेत खरे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान

भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाही उदयनराजेंचा बेधडक स्वभावाची प्रचिती आली आहे.

  • Share this:

मुंबई, 3 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या थेट आणि बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. कोणाला काय वाटेल, याचा विचार न करता ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात. राष्ट्रवादीचे खासदार असूनही त्यांनी आत्तापर्यंत अनेकदा स्वपक्षाच्या चुकांवर बोट ठेवलं आहे. त्यानंतर आता भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाही उदयनराजेंचा बेधडक स्वभावाची प्रचिती आली आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाबद्दल भाष्य केलं. त्यानंतर उदयनराजेंनी त्यांना उत्तर दिलं. 'मला कोणीही खो घालू शकत नाही. नाहीतर मीच खो घालेन,' असं उदयनराजेंनी म्हटलं. तसंच अडचणीच्या काळात ज्यांनी मला साथ दिली तेच माझ्यासाठी खरे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आहेत, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, उदयनराजेही भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. 'सत्ताधारी भाजप 'ईडी'ची भीती दाखवून विरोधातील नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहे,' असा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

'तुम्हालाही ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये जाण्यास भाग पाडण्यात येत आहे का,' असा प्रश्न उदयनराजेंनाही विचारण्यात आला. यावर उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली आहे. 'माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी असताना मला ईडीची भीती कशी वाटेल,' अशी मिश्कील प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरून गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडत आहेत. उदयनराजे भाजपमध्ये दाखल होणार की राष्ट्रवादीतच राहणार, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. त्यामुळे आपल्या बेधडक स्वभावासाठी परिचित असणारे उदयनराजे आपल्या राजकीय वाटचालीबाबत सावध पाऊलं का टाकत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

SPECIAL REPORT : आजोबांसाठी नातू सरसावला, थेट अमित शहांवर सोडलं टीकास्त्र!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 08:58 AM IST

ताज्या बातम्या