मोठी बातमी, उदयनराजे घेणार यू-टर्न? भाजप प्रवेशाबाबत नवा ट्विस्ट

मोठी बातमी, उदयनराजे घेणार यू-टर्न? भाजप प्रवेशाबाबत नवा ट्विस्ट

उदयनराजे यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 9 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामध्ये नवा ट्विस्ट निर्माणा झाला आहे. भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, यासाठी उदयनराजेंनी आज पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर उदयनराजे यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

'आहोत तिथंच चांगलं आहे. भाजपमध्ये जाणं धोक्याचं ठरू शकतं,' असं म्हणत जवळच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीतच राहण्याची विनंती केली आहे. त्यामुळे उदयनराजेंनीही भाजप प्रवेशाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली असून ते राष्ट्रवादीतच राहतील, अशी शक्यता आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.

उदयनराजे का टाळू शकतात भाजप प्रवेश?

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, सगळ्या आव्हानांचा सामना करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत जर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाच तर त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे राजेंना पुन्हा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा सामना करावा लागेल. तेव्हा राष्ट्रवादीकडून उदयनराजेंसमोर कडवं आव्हान निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि अन्य काही नावं चर्चेत होती. त्यामुळे उदयनराजेंनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादी दुसऱ्या नेत्यांना ताकद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...

VIDEO: विधानसभेआधी शिवसेनेतच राडा, माजी आमदाराचे मंत्र्यावर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...