उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला फक्त 'या' एका कारणामुळे लागू शकतो ब्रेक

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला फक्त 'या' एका कारणामुळे लागू शकतो ब्रेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत लवकरच उदयनराजे भाजपमध्ये दाखल होतील, अशी चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे खासदार आणि साताऱ्यातील डॅशिंग नेते उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत लवकरच उदयनराजे भाजपमध्ये दाखल होतील, अशी चर्चा आहे. पण उदयनराजेंच्या भाजप प्रवेशात काही अडचणी असल्याचंही बोललं जाऊ लागलं आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. उदयनराजेंना तिकीट देण्यात येऊ नये, असा आग्रह साताऱ्यातील नेत्यांनी पक्षाकडे धरला होता. मात्र उदयनराजेंचा वैयक्तिक करिष्मा पाहता राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सातारा लोकसभेतून त्यांनाच संधी दिली.

उदयनराजेंनीही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा पराभव केला. पण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. देशभरात भाजपने मिळवलेल्या मोठ्या यशामुळे आघाडीतील नेतेही भाजपकडे ओढ घेऊ लागले आहेत. अशातच उदयनराजे भोसले हेदेखील पक्षबदलाच्या विचारात असल्याचं पाहायला मिळत आहे.

उदयनराजेंच्या भाजपमध्ये कोणता अडथळा?

उदयनराजे हे सध्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार आहेत. आता विधानसभा निवडणुकीआधी जर त्यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करायचा असल्यास त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसोबत सातारा मतदारसंघातील लोकसभेची पोटनिवडणूकही घेण्यात यावी, अशी अट उदयनराजेंनी भाजपकडे ठेवल्याचे समजते. पण राज्याच्या विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक घेणं तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचं बोललं जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होण्याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जर खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसेल तर उदयनराजेही आपल्या भाजपमध्ये जाण्याच्या विचाराचा पुनर्विचार करतील, असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. त्यामुळे आगामी काळात उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत नेमक्या काय हालचाली होतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

SPECIAL REPORT : सर्ज्याला धुण्यासाठी बादलीभर पाणी, पोळ्याला बळीराजाच्या डोळ्यात अश्रू!

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2019, 9:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading