शरद पवारांवर अमित शहांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही केला पलटवार

खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहांवर पलटवार केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 09:01 AM IST

शरद पवारांवर अमित शहांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही केला पलटवार

पुणे, 6 सप्टेंबर : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोलापुरातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शहा यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अमित शहांच्या टीकेचा समाचार घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही शहांवर पलटवार केला आहे.

'शरद पवारांनी काय केले, हे बाहेरच्या व्यक्तीने महाराष्ट्रात येऊन सांगायची गरज नाही. शरद पवार काय आहेत, हे महाराष्ट्राला माहीत आहेत,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अमित शहा आणि भाजपवर हल्लाबोल केला.

रोहित पवारांनी भाजपला दिलं होतं प्रत्युत्तर

'गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत. पण आत्ता बास झालं,' असं म्हणत भाजपविरोधात रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'कधी कुठे आणि कशी सुरुवात करायची, लवकरच ठरवू,' अशी फेसबुक पोस्ट लिहित रोहित पवारांनी विधानसभेआधी रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Loading...

उद्धव ठाकरेंनीही केली पवारांचा पाठराखण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवारांचं कौतुक केलं आहे. तसंच अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोलाही हाणला. 'महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली', असं सांगत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

SPECIAL REPORT : मित्रपक्षांसाठी काँग्रेस उदार, राष्ट्रवादीचं विधानसभेतही वर्चस्व!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 09:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...