Home /News /maharashtra /

supria Sule Reaction On Rajya Sabha Election: ''कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है''

supria Sule Reaction On Rajya Sabha Election: ''कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है''

भाजपने महाविकास आघाडीची काही मते फोडण्यात यश मिळवलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 11 जून: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल (Rajya Sabha Election Result)जाहीर झाले. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजपच्या गोटात एकच जल्लोष सुरू झाला. तर भाजपने आपला तिसरा उमेदवार विजयी करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार धक्का दिला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण अपक्षांची मत फुटलं असल्याची समोर आलं आहे. महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालात मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपने महाविकास आघाडीची काही मते फोडण्यात यश मिळवलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने हा रडीचा डाव खेळला, अशा शब्दात सुप्रिया सुळे निकालावर प्रतिक्रिया दिली. भाजपने हा रडीचा डाव खेळला. शरद पवार यावर सगळं बोललेच आहेत. आम्ही ड्रामा करत नाही, आम्ही खूप सिरियस काम करतो. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आमदाराने जबाबदारीने मतदान केलं, असंही त्या म्हणाल्या. ''माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा'' सुप्रिया सुळेंनी भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा ही दिल्या आहेत. भाजपच्या या यशात एकट्या देवेंद्रजींचं नाहीतर चंद्रकांत पाटील यांचंही योगदान आहेच की, अकेला देवेंद्र सबपे भारी, या भाजपच्या घोषणेवरून सुप्रिया ताईंनी चिमटा ही काढला आहे. कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, असं मिश्किल उदाहरण ही त्यांनी दिलं आहे. आमचे नेते पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षं ते विरोधात होते तर अर्धी वर्षं सत्तेत, असंही त्या म्हणाल्या आहेत. महाविकास आघाडी एक दोन दिवसात बैठक घेईल. त्यानंतर स्पष्ट होईल, कुठं काय कमी पडलं. आम्ही रोज रिक्स घेतो. ज्या घरात माझा जन्म झाला तिथं मी जेवढं यश बघितलं तेवढंच अपयश बघितलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. Lalbaugcha Raja:गणेशभक्तांचं आराध्य दैवत 'लालबागचा राजा'चा पाद्यपूजन सोहळा Live निवडून आयोगाकडून जे झालं तो बालिशपणा वाटतो. दबाब सगळ्यांवरच आहे. ही निवडणूक आहे, यात काही खात्री आहे का?, असा सवाल उपस्थित करत नबाब मलिक आणि अनिल देशमुख यांना डांबून ठेवलं, ते दोषी नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: BJP, NCP, Shiv Sena (Political Party), Supriya sule

पुढील बातम्या