खासदार अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर हल्लाबोल

खासदार अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर हल्लाबोल

आदित्य ठाकरेंनी विधानसभेपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर काढायला हवी होती. निमित्ताने काम काय करावे, हे समजलं असतं. मधल्या काळात यात्रा काढली असती तर कामाचे मुल्यांकन करता आले असते, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव, (प्रतिनिधी)

बारामती, 20 जुलै- आदित्य ठाकरेंनी विधानसभेपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर काढायला हवी होती. निमित्ताने काम काय करावे, हे समजलं असतं. मधल्या काळात यात्रा काढली असती तर कामाचे मुल्यांकन करता आले असते, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

भाजप सरकारकडून जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याऐवजी पवारसाहेब, अजितदादांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्यामुळे कोणीही पक्षांतर करणार नसल्याचा विश्वासही डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर चांगलाच हल्लाबोल केला. 2014 मध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, असे विचारणाऱ्यांना आरशात उभे राहिल्यावर स्वतःलाच आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असे विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पवारसाहेब आणि आजितदादांच्या नेतृत्त्वावरील विश्वासामुळे कोणीही पक्षांतर करणार नाही, असाही विश्वास डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या सभेत पाकीटमारांचा सुळसुळाट..

नेत्यांच्या सभा म्हटलं की त्याला हमखास गर्दी होते. ही गर्दी चोरट्यांसाठी मोठी पर्वणी असते. शनिवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकेर यांची नाशिकमध्ये सभा होती. त्या सभेला गर्दीही चांगली होती. त्याचा फायदा घेत पाकीटमार चोरट्याने काही नेत्यांच्या खिश्यांवर हात साफ केला. मात्र, अशाच एका प्रयत्नात एक चोरटा पकडला गेला आणि शिवसैनिकांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली.

आदित्य ठाकरेंच्या सभेदरम्यान पाकीटमारांचा सुळसुळाट दिसून आला. नाशिकच्या खुटवड नगर येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. आदित्य ठाकरे हे सभेच्या ठिकाणी पोहोचल्यावर स्थानिक नेते पदाधिकारी आणि नागरसेवकांनी आदित्य ठाकरेंचं स्वागत केले मात्र स्वागत करतेवेळी पाकीटमार हे या गर्दीचा फायदा उचलत होते.

पाकीटमार चोरट्याने स्थानिक नगरसेवक दिलीप दातीर यांच्या खिश्यातच हात घातला. मात्र, चोरट्याचा हा डाव फसला. दातीर यांच्या हा प्रकार लक्षात येताच दातीर आणि शिवसैनिकांनी चोरट्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

दरम्यान काही जणांकडून आपल्या खिशातून पैसे गायब झाल्याच्याही नंतर तक्रारी समोर आल्या. पोलीस आता त्या भामट्याची चौकशी करत असून चोरट्यांची टोळीच सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

VIDEO : भावी मुख्यमंत्री होण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

First published: July 20, 2019, 7:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading