विरोधकांच्या आरोपाला अमोल कोल्हेंचं कृतीतून उत्तर

विरोधकांच्या आरोपाला अमोल कोल्हेंचं कृतीतून उत्तर

लोकसभा निवडणुकीनंतर शिरूरचे खासदार मतदारसंघात दिसत नाहीत असा आरोप विरोधक नेहमी करत होते.

  • Share this:

रायचंद शिंदे, जुन्नर, 15 नोव्हेंबर : शिरूरचे खासदार मतदार संघात दिसत नाहीत या विरोधकांच्या आरोपाला डॉ. अमोल कोल्हे आज प्रतिउत्तर देत आपल्या पाहिल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या आपल्या जन्मगावपासून पहिल्या कार्यालयाचा शुभारंभ विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते केला.

लोकसभा निवडणुकीनंतर शिरूरचे खासदार मतदारसंघात दिसत नाहीत असा आरोप विरोधक नेहमी करत होते. यावर अमोल कोल्हे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 'विरोधकांचा हा खोटा अपप्रचार होता. माझ्यावर शरद पवार साहेबांनी राज्याची जबाबदारी दिली होती. यासह मी या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 पैकी 5 आमदार निवडून आणले हे यश घरात बसून नाही तर काम केल्यामुळेच आहे,' असं म्हणत अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

'यापुढे दर गुरुवारी आण शुक्रवारी माझं कार्यालय जनतेसाठी खुलं असेल. शिवाय शहरी भागासाठी हडपसर आणि ग्रामीण भागात नारायणगाव कार्यालय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या 5 आमदारांचीही मला मदत होईल. यामुळे विकास कामं करायला आणि नागरिकांच्या समस्या सोडवायला सोपं जाईल,' असंही कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

महाशिवआघाडीबद्दल भाष्य करणं टाळलं

राज्यात सध्या सर्वत्र संभाव्य महाशिवआघाडीबाबत चर्चा आहे. मुख्यमंत्रिपदावरून भाजपसोबत बिनसल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं अनोखं समीकरण राज्यात तयार होण्याच्या स्थितीत आहे. मात्र याबाबत भाष्य करणं अमोल कोल्हे यांनी टाळलं आहे. महाशिवआघाडीचा निर्णय होऊद्या. त्यानंतरच यावर बोलू, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

राज्यातल्या सत्ता संघर्षावर हे मीम्स तुम्ही पाहिलेत का? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या