महाराजांच्या वाढदिवसावरून भाऊबंदकी; जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा कार्यक्रमावर बहिष्कार

महाराजांच्या वाढदिवसावरून भाऊबंदकी; जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा कार्यक्रमावर बहिष्कार

उदयराजे कायम पक्षविरोधी भूमिका घेत असल्यानं कार्यक्रमाला जायचं कशाला असा पवित्रा राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलाय.

  • Share this:

सातारा 24 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा एक्कावन्नावा वाढदिवस आज साताऱ्या जोरात साजरा होतोय. सर्व पक्षांचे दिग्गज नेते साताऱ्यात दाखल झालेत. मात्र उदयराजे कायम पक्षविरोधी भूमिका घेत असल्यानं कार्यक्रमाला जायचं कशाला असा पवित्रा राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलाय.

हा वाद मिटवण्यासाठी साताऱ्यात आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हॉटेल प्रिती इथं बैठक घेतली. या बैठकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने सामने आले आणि वादही झाला. उदयनराजे कायम पक्षविरोधी भूमिका घेतात त्याची झळ पक्षाला बसते त्यामुळं आम्ही कार्यक्रमाला जाणार नाही असं सांगत शिवेंद्र यांच्यासह जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.

शिवेंद्र हे उदयनराजे यांचे चुलतबंधूही आहेत आणि त्यांच्यात अनेक वर्षांपासून वादही आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं ही भाऊबंदीकी पुन्हा एकदा पुढे आली.

First published: February 24, 2018, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading