सोलापूर, 28 ऑगस्ट: मोहोळ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्याकडे दोन जातीचे दाखले आहेत. धक्कादायक म्हणजे त्यांनी बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे दोन्ही दाखले सादर केले.
हेही वाचा...देवेंद्र फडणवीस आणि आपण पुन्हा एकत्र का आलो? अजित पवारांनी दिलं उत्तर
बुलडाणा जिल्ह्यात कैकाडी समाज हा SC मध्ये गणला जातो. त्यानुसार यशवंत माने यांच्याकडे SC चे जात प्रमाणपत्र आहे. तर पुणे जिल्ह्यात कैकाडी समाज हा VJ विमुक्त वर्गात येतो. त्यामुळे आमदार माने हे मागील 100 वर्षांपासून इंदापूर तालुक्यात राहत असून त्यांनी बुलडाण्यातून SC वर्गाचा जातीचा दाखला दाखल करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे.
आमदार यशवंत माने यांचा कैकाडी समाजाचा इंदापूरमधील शेळगावचा दाखला हा VJ विमुक्त वर्गातील असून 1985 साली त्यांनी हा दाखला काढला होता. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमधून त्यांनी SC चा दाखला काढून त्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्याचा दावा तक्रारदार सोमेश क्षीरसागर यांनी यावेळी केला. याबाबत बुलडाणा जातपडताळणी कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये देखील फिर्याद दिल्याचा दावा सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे.
हेही वाचा......अन्यथा मंत्र्यांना दुग्धाभिषेक! राजू शेट्टींचा दुसऱ्या दिवशीही सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, या आरोपाबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने यांना 'News18 लोकमत'ने संपर्क साधला असता, सोमेश क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपाबद्दल मला फार काही बोलायचे नाही. त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करु द्या. मी यावर काही प्रतिक्रिया देणार नाही, असं आमदार माने यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता सोमेश क्षीरसागर यांच्या तक्रारीची जातपडताळणी विभाग दखल घेतो का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.