Home /News /maharashtra /

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीच्या आमदाराचा उदयनराजेंना थेट सवाल, म्हणाले...

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीच्या आमदाराचा उदयनराजेंना थेट सवाल, म्हणाले...

'उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षणासाठी नेतृत्व करण्याचे आवाहन मराठा संघटनांनी केले होते, त्याचे पुढे काय झाले'

    मुंबई, 01 डिसेंबर : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावरून भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीने उदयनराजे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर मोर्चे निघाले होते, तेव्हा फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रश्न मार्गी का लावले नाहीत, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (NCP MLA Shashikant Shinde) यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला जर मराठा आरक्षण देता येत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या, मी त्यांच्याकडून मराठा  आरक्षण मिळवून देतो, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केले होते.  त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देत  राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंना सणसणीत टोला लगावला आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. IND vs AUS : काँग्रेस नेत्याने उपस्थित केले केएल राहुलच्या खेळ भावनेवर प्रश्न देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अनेक मोर्चे निघाले होते. यात धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मोर्चे काढले होते. फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन सुद्धा दिले होते. मग त्यांनी धनगर समाजाचा प्रश्न मार्गी का लावला नाही,  पाच वर्ष सत्तेत असताना दोन्ही समाजाला किती न्याय दिला, असा सवाल शिंदे यांनी उपस्थितीत केला. मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. भाजपच्या काळात जे वकील नेमण्यात आले होते. तेच वकील हा खटला लढवत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक या गोष्टीचे राजकारण केले जात आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असून भाजपकडून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा  आरोपही शशिकांत शिंदे यांनी केला लाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का? तसंच, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महाविकास आघाडी सरकाराचा पूर्ण प्रयत्न आहे. आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे हा स्पष्ट हेतू आहे. अशा वेळी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षणासाठी नेतृत्व करण्याचे आवाहन मराठा संघटनांनी केले होते, त्याचे पुढे काय झाले, असंही शिंदे म्हणाले. काय म्हणाले होते उदयनराजे? 'देवेंद्र फडणवीस हे आपल्याच वयाचे आहेत. त्यांनी आरक्षण टिकवलं, त्यांना नाव ठेवली जातात. आता सत्तेत आहात ना मराठा आरक्षणाला पुढे न्या. सत्तेत राहायचंय ना, महाराष्ट्र आहे, मराठा समाज निर्णायक जात आहे. जातीतला कोणताही उमेदवार असू देत, त्याच्याकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीला लावणार, असं आश्वासन घ्या, असंही उदयनराजे यांना सांगितलं. 'मला समजत नाही, की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. सर्वधर्म समभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षांपासून झालं आहे. मी मराठा म्हणून जन्माला आलो असलो तरी मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा या भूमिकेतून आज मुद्दे मांडणार आहे. किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार आहात. मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचारा का केला नाही?' असा सवाल देखील उदयनराजेंनी उपस्थित केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या