Home /News /maharashtra /

भरसभेत राष्ट्रवादी आमदार बनले 'पुष्पाराज', 'मैं झुकेगा नही...' म्हणत फिरवला दाढीवरून हात, VIDEO व्हायरल

भरसभेत राष्ट्रवादी आमदार बनले 'पुष्पाराज', 'मैं झुकेगा नही...' म्हणत फिरवला दाढीवरून हात, VIDEO व्हायरल

विविध बॉलिवूड अभिनेते, क्रिकेटपटू, सोशल मीडिया सेलिब्रिटीज आणि आता राजकीय मंडळींना पुष्पा चित्रपटानं भुरळ घातली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे (Beed) आमदार (NCP MLA) संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar) देखील मागे राहिले नाहीत.

पुढे वाचा ...
बीड, 14 फेब्रुवारी: दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika mandanna) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा' (Pushpa Film) या चित्रपटानं देशभरात धुमाकूळ घातला आहे. विविध बॉलिवूड अभिनेते, क्रिकेटपटू, सोशल मीडिया सेलिब्रिटीज  आणि आता राजकीय मंडळींना देखील पुष्पा चित्रपटानं भुरळ घातली आहे. यापूर्वीच शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुष्पा चित्रपटातील 'मैं झुकेगा नही...' (Main jhukega nahi) म्हणत भारतीय जनता पक्षाला (BJP) टोला लगावला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे (Beed) आमदार (NCP MLA) संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी देखील मंचावरून हा डायलॉग बोलून दाखवला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसागर यांचा हा नवा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' चित्रपटातील डायलॉग थेट राष्ट्रवादीच्या आमदाराच्या तोंडून एका जाहीर कार्यक्रमांत ऐकायला मिळाला आहे. हेही वाचा-संभाजीराजे छत्रपतींची मोठं घोषणा, मराठा आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल 'मैं झुकेगा नही...' म्हणत त्यांनी आपल्या दाढीवरून हात फिरवला आहे. आमदारांच्या तोंडून हा डायलॉग ऐकून उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील मोठी दाद दिली, या अगोदरही संदीप क्षीरसागर यांचा आंदोलक महिलेची समजूत काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर हा व्हिडीओही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हेही वाचा-Breaking News: आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा खरंतर राष्ट्रवादी आमदार संदीप क्षिरसागर बीडमध्ये एका सभेत आगामी नगरपरिषद निवडणुकांबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी हा डायलॉग बोलून दाखवला आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, 'निवडणुकीत सर्वजण एकत्र लढणार आहेत. माझ्या पाठीशी तरुण वर्ग आहे. तसेच आई-बहिणींचा आशीर्वाद देखील आहे.' यावेळी त्यांनी निवडणुकीत आपल्याला कसलीही हरण्याची भीती नसल्याचं म्हणत 'मैं झुकेगा नही...' हा डायलॉग मारला आहे. तसेच यावेळी त्यांनी आपल्या दाढीवरून देखील हात फिरवला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या वेगानं व्हायरल होतं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Beed, Maharashtra politics, Mla, NCP

पुढील बातम्या