Home /News /maharashtra /

पत्नीसाठी Emotional झाले आमदार रोहित पवार, व्यक्त केली मन की बात

पत्नीसाठी Emotional झाले आमदार रोहित पवार, व्यक्त केली मन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) सोशल मीडियावर (Social Media) बरेच सक्रिय असतात.

  पुणे, 29 मे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) सोशल मीडियावर (Social Media) बरेच सक्रिय असतात. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं किंवा एखाद्या मुद्द्यावर मत व्यक्त करण्यासाठी रोहित पवार बऱ्याचदा सोशल मीडियाचा वापर करतात. आज ही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. पण यावेळी भावना किंवा मत व्यक्त करण्याचं कारण थोडं वेगळं आहे. तसंच या वेळी ते थोडे इमोशनल देखील झाले आहेत. कारण आज रोहित पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस (Rohit Pawar's wedding anniversary) आहे. आज रोहित पवार आपल्या लग्नाचा 12 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं त्यांनी आपली पत्नी कुंती रोहित पवार यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये इमोशनल झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार यांची इमोशनल पोस्ट रोहित पवार यांनी काय लिहिलं आपल्या पोस्टमध्ये
  प्रिय कुंती!
  माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं.
  मी सार्वजनिक जीवनात असल्याने मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, म्हणून तू स्वतःहून हा निर्णय घेतलास. तो वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र किती अवघड आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास आणि विशेष असं आहे आणि ते नेहमीच तसं राहील.
  आज आपल्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली. वैवाहिक आयुष्याच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त आणि पुढंही वर्षानुवर्षे एकमेकांची साथ अशीच कायम राहणार असल्याबद्दल Thank U #कुंती!
  आमदार रोहित पवारांना शिवसेना खासदाराकडून इशारा शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (Shiv Sena MP Gajanan Kirtikar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला आहे. हा सर्व प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे. राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला मोठी परंपरा आहे. त्याची जान राजकारण करताना ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत, असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: NCP, Rohit pawar

  पुढील बातम्या