Home /News /maharashtra /

मोदींच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन वेगवेगळ्या भूमिका, आव्हाडांनी टीका केल्यानंतर रोहित पवार म्हणतात...

मोदींच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन वेगवेगळ्या भूमिका, आव्हाडांनी टीका केल्यानंतर रोहित पवार म्हणतात...

राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

    मुंबई, 3 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. 'भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असताना राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र मोदींच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय एकतेचं प्रदर्शन करण्यासाठी दिवे पेटवण्याचं आवाहन केलं असतानाच रोहित पवार यांनीही एक आवाहन केलं आहे. 'आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो,' असं रोहित पवार म्हणाले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Narendra modi, Rohit pawar

    पुढील बातम्या