मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...ते गिफ्ट कोणते? रोहित पवारांनी केलं भावनिक आवाहन, पाहा हा VIDEO

...ते गिफ्ट कोणते? रोहित पवारांनी केलं भावनिक आवाहन, पाहा हा VIDEO

'आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल'

'आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल'

'आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल'

बारामती, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा 29 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. पण, कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना एक खास आवाहन केलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, भाऊ-भगिनी व कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करायला सुरुवात केली. आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल' असं रोहित पवार म्हणाले. तसंच,'वाढदिवसानिमित्त मला आपल्या सर्वांकडून एक गिफ्ट हवंय. मी ते तुम्हाला हक्काने मागतोय आणि आपण ते मला नक्की द्याल असा मला विश्वास आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांना, महिलांना, तरुणांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसाला बॅनर, होर्डिंग, जाहिराती न करण्यापेक्षा त्याचा खर्च हा एखाद्या गरजूच्या मदतीसाठी करावा, असे आवाहन रोहित पवार यांनी केले. त्याचबरोबर, लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन शिक्षण देणे सध्या सुरू आहे.  त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.  काही तरुणांना हॉस्टेलची फी असेल किंवा कॉलेजची फी असेल ती देण्यासाठी मदत करावी, असं आवाहन रोहित पवार यांनी केले. तसंच, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शारदानगर येथील हजारो मुली शिकत असता. तेथील 100 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: NCP, Rohit pawar

पुढील बातम्या