रोहित पवार शेतकऱ्याच्या मदतीला आले धावून, धक्का देऊन अपघातग्रस्त कार काढली बाहेर

'पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा'

'पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा'

  • Share this:
    मुंबई, 19 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) नेहमी आपल्या ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी सामाजिक भान जपत अपघातग्रस्तांना (accident car) केलेल्या मदतीमुळे ते चर्चेत आले आहे. रोहित पवार यांनी अपघातग्रस्त शेतकऱ्याला मदत केल्यामुळे त्यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. सांगली (sangali) जिल्ह्यातील माण तालुक्यात मांडवे-पिंगळी दरम्यान एका शेतकऱ्याच्या ओमनी व्हॅनला अपघात झाला होता. ही घटना 18 नोव्हेंबरची आहे. अपघातग्रस्त ओमनी व्हॅन रस्त्याच्या बाजूला जाऊन एका लोखंडी ग्रीलवर  जाऊन थांबली होती. त्याचवेळी याच मार्गावर रोहित पवार जात होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाडीतून खाली उतरले आणि रस्त्याच्या खाली गेलेल्या अपघातग्रस्त ओमनी व्हॅनला बाहेर काढले. त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांनीही अपघातग्रस्त कारला बाहेर काढण्यास मदत केली. धक्कादायक! मुंबईत 'बच्चा चोर' गॅंग पुन्हा सक्रिय, समोर आली हृदय हेलणारी घटना या अपघातात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही. रोहित पवार यांनी अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कौतुक होत आहे. 'पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो,  त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये, असं आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published: