नव्या राजकीय समीकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नव्या राजकीय समीकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर: अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी अखेर सत्ता संघर्षाचा पेच सुटला आहे. शनिवारी राजभवनामध्ये सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन्ही मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन केल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. तर अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. असं शरद पवारांनी ट्विट केलं आहे. दरम्यान या राजकीय घडामोडींवर दुपारी 12 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

आम्ही जनतेसोबत आहोत अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.राज्यात सत्ता संघर्षानंतर आलेल्या भूकंपाबाबत रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा या सगळ्या घटनाक्रमाबद्दल प्रतिक्रिया देतील, तेव्हाच याबाबतची स्पष्ट होऊ शकणार आहे.

अजित पवारांनी दिली माहिती

महिनाभर नुसतं चर्चेचं गुऱ्हार चालू होतं मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसं होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

वाचा-'चाणक्य' समजण्याची हीच ती वेळ!', अशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला

'त्या' दोन रात्री ठरल्या महत्त्वाच्या..

दरम्यान, देवेंद्र फडवणीस यांनी 'त्या' दोन रात्री दिल्ली वारी करून महाराष्ट्र राजकीय ऑपरेशन यशस्वी केले. मागील चार दिवसांत देवेंद्र फडवणीस यांनी मध्यरात्री दिल्लीत जाऊन आले. त्याच रात्री अनेक राजकीय घडामोडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही सत्तास्थापनेचा राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन शनिवारी उभय नेत्यांना शपथविधीसाठी बोलावले. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू,असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.दुसरीकडे, 'सिल्व्हर ओक'वरही अजित पवार यांचा राग नेमका याचसाठी होता का? असा सवालही उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी पहिल्या दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीच्या सरकारला विरोध होता. त्यात धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही फारसे अनुकूल नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.

वाचा-नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे महाराष्ट्रात जबरदस्त राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'

First published: November 23, 2019, 10:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading