Home /News /maharashtra /

मोठी बातमी, रोहित पवार यांनी बोलून दाखवली मंत्रिपदाबद्दलची इच्छा, म्हणाले...

मोठी बातमी, रोहित पवार यांनी बोलून दाखवली मंत्रिपदाबद्दलची इच्छा, म्हणाले...

'जर नेत्यांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं की या कार्यकर्त्याला पद द्यावं, ज्या पद्धतीने मी आमदार म्हणून माझ्या पदाला न्याय देतोय'

'जर नेत्यांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं की या कार्यकर्त्याला पद द्यावं, ज्या पद्धतीने मी आमदार म्हणून माझ्या पदाला न्याय देतोय'

'जर नेत्यांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं की या कार्यकर्त्याला पद द्यावं, ज्या पद्धतीने मी आमदार म्हणून माझ्या पदाला न्याय देतोय'

उस्मानाबाद, 22 जानेवारी : 'वरिष्ठ नेत्यांनी मंत्री म्हणून संधी दिली तर पदाला न्याय देणार' असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी मंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे रोहित पवार (Rohit Pawar) यांना मंत्रिपद देण्याबाबत काही हालचाली सुरू आहे का, या चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या परांडा येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना रोहित पवार यांनी मंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'मी कोणत्याही पदासाठी काम केले नाही. मी लोकांसाठी काम केलेलं आहे. लोकांमध्ये राहून लोकांच्या हितासाठी जे होईल ते प्रामाणिकपणे काम केले आहे. माझ्या मतदारसंघातील काम असेल किंवा मतदारसंघाबाहेरील काम असेल. जर नेत्यांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं की या कार्यकर्त्याला पद द्यावं, ज्या पद्धतीने मी आमदार म्हणून माझ्या पदाला न्याय देतोय तसाच त्या पदाला न्याय देऊन लोकांच्या हिताचे काम नक्कीच करेल' असं स्पष्ट मत रोहित पवार यांनी मांडलं. (महिला वकिलासोबत ATMमध्ये तरुणाचं विकृत कृत्य; नंतर हातातील पैसे घेऊन काढला पळ) तसंच, 'मराठवाडा विदर्भसह अन्य भागामधील अनेक तरुण आमदार काम करित आहेत ते मंत्री पदासाठी उत्सुक असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिकेवरून वादंग सुरू आहे. 'चित्रपटात काही चुकीच्या गोष्टी व इतिहासाची मोडतोड केली असेल तर त्याला व्यक्तिशः विरोध करणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी बोलून दाखवली. मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्याचा उधळला डाव; अंतर्वस्त्रात लपवले होते 60 हजार डॉलर तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली असली तरी रोहित पवार यांनी घेतलेल्या भूमिकामुळे पुढील काही दिवस तरी हे प्रकरण राजकीय पटलावर रंगणार असेच दिसतंय.
Published by:sachin Salve
First published:

Tags: NCP, Osmanabad, Rohit pawar

पुढील बातम्या