Home /News /maharashtra /

पराभवानंतर तरी भाजपनं खऱ्या अर्थानं.... रोहित पवारांनी दिला खोचक सल्ला

पराभवानंतर तरी भाजपनं खऱ्या अर्थानं.... रोहित पवारांनी दिला खोचक सल्ला

भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती

  मुंबई, 4 डिसेंबर: 'भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar)यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP),काँग्रेस (Congress)व शिवसेनेसह (Shiv Sena) सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली, असा टोला देखील रोहित पवार यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. हेही वाचा...मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर पलटवार विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली असून भाजपचा धुव्वा उडवला आहे. रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीकेची तोफ दागली आहे. भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत येथे महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आतातरी भाजपनं (@BJP4Maharashtra)नं खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिक काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी खोचक सल्ला देखील दिला आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला निकाल आला. भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, उर्वरित पाचपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा नागपूर  पदवीधर निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला आहे. अभिजित वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी ही आघाडी अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवली आणि जोरदार मुसंडी मारत भाजपच्या गडाला मोठं खिंडार पाडलं. भाजपचे संदीप जोशी यांच्या मोठ्या मताधिक्यानं पराभव केला. पुण्यात भाजपचा गड ढासळला पुण्यातही भाजपचा गड ढासळला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांची पराभव करत 48 हजार 824 हजारांच्या मताधिक्यानी दणदणीत विजय मिळवला आहे. हेही वाचा...भरधाव डंपरनं चिरडलं! भुसावळात लग्नाला आलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला औरंगाबादेत राष्ट्रवादीची विजयाची हॅट‌्ट्रिक औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Maharashtra, Rohit pawar, Sharad pawar

  पुढील बातम्या