सुशांत सिंहची हत्या झाल्याचं म्हणता मग पुरावे का देत नाहीत, रोहित पवारांचा भाजपला सवाल

सुशांत सिंहची हत्या झाल्याचं म्हणता मग पुरावे का देत नाहीत, रोहित पवारांचा भाजपला सवाल

सुशांतसिंह प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का? अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 7 ऑगस्ट: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची हत्या झाल्याचं तुम्ही म्हणता आणि पुरावेही देत नाही. तुमचे पुरावे तुमच्याकडेच ठेवता. मग सुशांतसिंह प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का? अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, असंही आणि फक्त आरोप करत आहेत. आरोप करतात तर पुरावेही देत नाही, हा काय प्रकार आहे, असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.

हेही वाचा... कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबीयांनी अनुभवली शरद पवार यांची संवेदशीलता

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीच्या निमित्ताने रोहित पवार आले होते. यावेळी सुशांतसिंह प्रकरणावरून त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपचा सोशल मीडिया सक्षम आहे. या मीडियावर एखादा ट्रेंड चालवणे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमते. भाजपचे नेते शब्दात खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. आज सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तेच चालू आहे, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली. भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्ये करत असतील, तर ते राजकारण करीत आहेत. हे माझ्यासारख्याच काय तर सर्वसामान्य नागरिकांनाही कळतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी CBI कडून गुन्हा दाखल

दुसरीकडे, सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्येप्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरुन CBIने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकर CBIच्या मुंबई विभागाला हे प्रकरण वर्ग करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा... मनसे नगरसेवकावर भडकले अजित पवार; म्हणाले, लांबून बोला आमचे 4 मंत्री पॉझिटिव्ह

दिल्ली CBIनं एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मित्र सॅन्मुयल मिरांडा, श्रुती मोदीसह एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी कट रचणे, आत्महत्येस जबाबदार असणे, अडवणूक करणे, चोरी, विश्वासघात करणे, फसवणूक करणे, कट रचणे या अंतर्गत , कलम 120 B,306,341,342,380,406,420,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2020, 7:23 PM IST

ताज्या बातम्या